Fight At Kalyan Railway Station: विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर महिलेची काढली छेडकनी, आरोपी पोलीसांच्या ताब्यात

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाने एक महिलेला एकटं बघून तीची छेडकानी केल्याचे प्रकार घडला आहे.

Fight At Kalyan Railway Station: विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर  महिलेची काढली छेडकनी, आरोपी पोलीसांच्या ताब्यात
Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

 Fight At  Kalyan Railway Station: विठ्ठलवाडी रेल्वे स्थनाकावर महिलेला एकटं पाहून तरुणाने तीची छेडकानी करत असल्याचा प्रकार घडला आहे. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर बुधवारी सांयकाळी ही घटना घडली आहे. महिलेच्या पतीने बघताच त्याने आरोपीला व्यवस्थितरीत्या विचारण्याचा प्रयत्न करत असातना त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यांच्या दोघांत हाणामारी देखील होवू लागली. रेल्वे पोलीसांना कळताच घटनास्थळी धाव घेतला. आणि आरोपी रोहीत गायकवाड याला पोलीसांनी ताबडतोब ताब्यात घेतले.

स्थानकावर हा प्रकार घडत असताना इतर प्रवासांनी देखील हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला. हे जोडपं उल्हासनगर येथील रहीवासी आहेत. काही कारणांसाठी ते दोघे डोंबिवलीला जायला निघाले. विठ्ठलवाडी स्थानकावर आले.दरम्यान महिलेचा पति पाणीची बॉटल घेण्यासाठी रेल्वे स्थानकावरिल दुकानात गेला. याचवेळी आरोपी त्या महिलेच्या जवळ आला आणि तीची छेड काढत तीला 'मला ब्लॉक का केल ? असं विचारत राहीला. या प्रकरणात तीचा पती जवळ आला आणि महिलेच्या पतीने तिची छेड का करत आहे असं विचारता त्यांच्या दोघांत बाचाबाची झाली.

दोघांत हाणामारी चालू झाली. इतर प्रवाशांनी दखल घेत असताना पोलीसांना या प्रकरणेची माहिती झाली. पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. महिलेच्या तक्रारीवरुन कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

(The above story first appeared on LatestLY on Jul 06, 2023 03:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).