Viral Video: मथुरेत आचार्य कौशिक महाराजांनी रेल्वे ट्रॅकवर केला भगवान शंकराचा जलाभिषेक, व्हिडिओ व्हायरल
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक याला कडाडून विरोध करत आहेत. मात्र, या व्हिडिओबाबत आश्रमाने दावा केला आहे की, हे फुटेज बरेच जुने आहे.
Viral Video: आचार्य कौशिक महाराजचा मथुरेत रेल्वे रुळांवर भगवान शंकराचा जलाभिषेक करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक याला कडाडून विरोध करत आहेत. मात्र, या व्हिडिओबाबत आश्रमाने दावा केला आहे की, हे फुटेज बरेच जुने आहे. या व्हिडिओवर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा प्रकारे शिवलिंगाला गलिच्छ मार्गावर ठेवणे हा शिवलिंगाचा अपमान असून हे कृत्य समाजालाही दुखावणारे असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आश्रमाने आता हे फुटेज अनेक वर्षे जुने असल्याचे म्हटले आहे. आचार्य कौशिक यांचे भाऊ रामदेव शास्त्री म्हणाले की, ही घटना चुकीची असून काही लोक जुने व्हिडिओ व्हायरल करून त्यांच्या भावाची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्विटरवर @AcharyaBharatJi या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Onion Bombs Blast In Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात 'कांदा बॉम्ब'चा स्फोट; एक ठार, 5 जखमी (Watch Video)
येथे पाहा, आचार्य कौशिक महाराजांचा व्हिडीओ