विजय मल्ल्या प्रत्यार्पण: सीबीआय, EDचे पथक लंडनला रवाना
सध्या बंद अवस्थेत असलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचा प्रमुख विजय मल्ल्या (वय 62 वर्षे) याच्यावर भारतीय बँकांचे कर्ज रुपातले सुमारे 9000 कोटी रुपये थकवल्याचा तसेच, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे.
लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयात विजय मल्ल्या सोमवारी (११ डिसेंबर) हजर राहणार आहे. या वेळी त्याच्या प्रत्यार्पण प्रकरणावरही निर्णय होऊ शकतो. त्यामुळे भारताचे केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation) आणि अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) विभागाचे एक संयुक्त पथक इंग्लंडला आजच (रविवार, ९ डिसेंबर) रवाना झाले. विजय मल्ल्या प्रकरणावर सीबीआयचे संचालक राकेश अस्थाना लक्ष ठेऊन आहेत.
सध्या बंद अवस्थेत असलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचा प्रमुख विजय मल्ल्या (वय 62 वर्षे) याच्यावर भारतीय बँकांचे कर्ज रुपातले सुमारे 9000 कोटी रुपये थकवल्याचा तसेच, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. 2017च्या एप्रिल महिन्यापासून मल्ल्यावर प्रत्यार्पण वॉरंट आहे. तेव्हापासून तो जामीनावर बाहेर आहे. (हेही वाचा, कर्जाची 100% परतफेड करण्यास तयार, कृपया स्वीकार करा: विजय मल्ल्या)
दरम्यान, विजय मल्ल्याने आपण कर्जाची रक्कम भरण्यास तयार आहोत. मात्र, आपल्यला व्याज देता येणार नाही, असे ट्विट करून कर्ज देणाऱ्या बँकांना एकप्रकारे ऑफरच दिली होती. या ट्विटमध्ये विजय मल्ल्याने म्हटले होते की, 'गेल्या तीन दशकांमध्ये किंगफिशर या सर्वात मोठ्या मद्यउत्पादक समूहाने भारतात व्यवसाय केला आहे. या कालावधीमध्ये या समूहाने अनेक राज्यांना मदत केली आहे. किंगफिशर एअरलाईन्सनेही सरकारकडे मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा केली आहे. मात्र, एका शानदार एअरलाईन्सची दुख:द अखेर झाली. पण, तरीसुद्धा मी बँकांच्या कर्जाची परतफेड करण्यास तयार आहे. बँकांनी कृपा करुन त्याचा स्वीकार करावा.'