Variable Dearness Allowance (DA) Hike: केंद्र सरकारने कर्मचार्यांसाठी महागाई भत्त्याबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय;पहा नेमका कोणा-कोणाला होणार फायदा
Ministry of Labour & Employment च्या माहितीनुसार, VDA हा औद्योगिक कामगारांच्या सरासरी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे बदलला जातो.
कोविड 19 जागतिक आरोग्य संकटाच्या काळातच आता केंद्र सरकारच्या लाखो कर्मचार्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Labour & Employment) आता व्हेरिएबल डिअरनेस अलाऊंस (Variable Dearness Allowance) मध्ये 105 रूपयांची वाढ करून तो 210 प्रति महिना करण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2021 पासून हा लागू होणार आहे. यामुळे आता कर्मचार्यांच्या किमान वेतन दरांमध्ये वाढ होणार आहे.
केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने आता केंद्राच्या अखत्यारित येणार्या विविध श्रेणीमधील कर्मचार्यांच्या रोजगारांमध्ये बदल केले आहेत. सध्या व्हीडीए मध्ये बदल करण्याची अधिसूचना जारी झाली आहे. मंत्री संतोष गंगवार यांच्या माहितीनुसार, यामुळे देशातील 1.50 कोटी श्रमिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. व्हीडीए मध्ये बदल केल्याने या वैश्विक संकटाच्या कठीण काळात त्यांना एक मदतीचा हात मिळेल.
केंद्रीय क्षेत्रातील रेल्वे प्रशासन, खाणी, तेल क्षेत्रं, प्रमुख बंदरांवर कामासाठी स्थापन केलेल्या कोणत्याही संघटनांच्या अंतर्गत काम करणार्या कर्मचार्यांसाठी हा व्हीडीए मधील बदल फायदेशीर ठरणार आहे. हे दर कॉन्ट्रॅक्ट किंवा कॅज्युअल अशा दोन्ही कर्मचार्यांसाठी समान असतील. (वाचा - 7th Pay Commission: केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तात वाढ होण्यास विलंब; कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे प्रतिक्षा वाढली).
दरम्यान Ministry of Labour & Employment च्या माहितीनुसार, VDA हा औद्योगिक कामगारांच्या सरासरी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे बदलला जातो. ही लेबर ब्युरोने संकलित केलेली किंमत निर्देशांक असते.