Vande Bharat Trains च्या नव्या गाड्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज; पहा काय आहे खासियत

यामध्ये सेंट्रलाईज कोच मॉनिंटरिंग सिस्टम आणि इमर्जन्सी ईव्हाक्युलेशन यांसारखे नवीन फिचर्स असणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

Narendra Modi flags off Vande Bharat Express (Photo: IANS)

वन्दे भारत ट्रेनच्या (Vande Bharat Trains) नवीन गाड्यांमध्ये वेगवेगळ्या सुविधा दिसून येणार आहेत. यामध्ये सेंट्रलाईज कोच मॉनिंटरिंग सिस्टम आणि इमर्जन्सी ईव्हाक्युएशन यांसारखे नवीन फिचर्स असणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 75 नवीन वन्दे भारत एक्स्प्रेस देशाच्या सर्व कोपऱ्यांना एकत्रित आणतील, अशी माहिती 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिली होती. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी ही घोषणा करण्यात आली होती.

भारतीय रेल्वेच्या वन्दे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये या नवीन गाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यामधील पहिली गाडी वाराणसी दिल्ली या मार्गावर चालली असून दुसरी गाडी कत्तरा दिल्ली या मार्गावरुन धावली आहे.

या गाड्यांमध्ये शताब्दी सारख्या सेमी हाय स्पीड ट्रेन्सचा समावेश केला असून यामध्ये जीपीएस बेस्ड पॅसेन्जर इन्फॉर्मेशन सिस्टम, सीसीटीव्ही कॅमेरा, ऑटोमेटीक स्लायडिंग डोअर्स, रेक्टॉगल कोच आणि व्हॅक्युम बेस्ड टॉयलेट्स यांचा समावेश करण्यात आला आहे.

नवीन सुधारीत वन्दे भारत ट्रेन्समध्ये सहज ईव्हाक्युएशनसाठी 4 इमर्जन्सी व्हिंडोज देण्यात आल्या आहेत. यासोबतच प्रत्येक कोचमध्ये 4 डिझाटर्स लाईट्स देखील देण्यात आल्या आहेत. ट्रेनमधील सर्व लाईट्स बंद झाल्यानंतर या डिझाटर्स लाईट्सचा वापर करण्यात येतो. या ट्रेन्समध्ये प्रवाशांना आरामदायी अनुभव मिळण्यासाठी पुशबॅक reclining  सीट्स देण्यात आल्या आहेत. यासोबतच डोअर सर्किट्समध्ये आग न लागणाऱ्या वायर्सचा वापर करण्यात आला आहे. तसंच विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास 3-4 तास योग्य व्हेटिलेशन होण्यासाठी देखील सोय करण्यात आली आहे. या गाड्या मार्च 2022 मध्ये डिस्पॅच करण्याची योजना असून जून 2022 मध्ये प्रवाशांसाठी सुरु करण्याचा मानस आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif