Uttarkashi Tunnel Rescue: आनंदाची बातमी! उत्तरकाशीत कोसळलेल्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी संपर्क, जेवणाची पाकिटे पोहोचली (Watch Video)

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथी सिल्क्यारा बोगदा कोसळल्याने बोगद्यातच अडकलेल्या कामगारांशी संपर्क झाला आहे. त्यांच्यासाठी ऑक्सिजन, अन्नाची पाकीटे पोहोचविण्यात आली आहेत. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांना अन्नाची जवळपास 150 पाकिटे पोहोचविण्यात आली आहेत.

Uttarkashi Tunnel Rescue | (Photo Credits: X)

Food Supply in Silkyara Tunnel: उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातील उत्तरकाशी येथील सिल्यकारा बोगदा (Silkyara Tunnel Collapse) कोसळला. ज्यामुळे जवळपास 41 कामगार बोगद्यातच अडकले. आनंदाची बातमी अशी की, या कामगरांशी प्रदीर्घ प्रयत्नांनंतर संपर्क साधण्यास यश आले आहे. ज्यामुळे त्यांना ऑक्सिजन, अन्नाची पाकीटे पोहोचविण्यात आली आहेत. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांना अन्नाची जवळपास 150 पाकिटे पोहोचविण्यात आली आहेत. बोगदा कोसळण्याची घटना घडल्यानंतर प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते. ज्यात वारंवार अडथळा येत होता. अखेर एक मोठा पाईप या कामगारांपर्यंत पोहोचवण्यात यश आले. ज्यामुळे या कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला.

डॉक्टरांच्या निगराणीखाली बनवले अन्नपदार्थ

स्वयंपाकी राजू राणा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, कामगारांठी पाठविण्यात आलेले अन्नपदार्थ हे पूर्णपणे डॉक्टरांच्या निगराणीखाली बनविण्यात आले आहे. ज्यामध्ये तेल आणि मसाल्याचे प्रमाण खूपच कमी आहे. जे जेवण पचण्यासाठी अत्यंत हलके असेल याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. आम्ही या जेवणामध्ये व्हेज पूलाव, मटर-पनीर, आणि बटर चपाती बनवली आहे. जी पाईपद्वारे कामगारांपर्यंत पोहोचवली. आम्ही पाठवलेलेल अन्न पुरेषा प्रमाणात आहे, असेही या स्वयंपाक्याने सांगितले. (हेही वाचा, Uttarkashi Tunnel Collapse: बोगद्याच्या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांचा पहिला व्हिडिओ समोर, बचाव कर्मचारी वॉकी-टॉकीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न)

आता फळे, औषधेही पोहोचवणार- एनएच आयडीसीएल

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सूविधा महामंडळ (NHIDCL) अध्यक्ष अंकूश मनिष खुलको यांनी सांगितले की, आम्ही खिचडी आणि डाळ पाठविण्याचा प्रयत्न केला. परंतू हे पदार्थ आम्ही कर्मचाऱ्यापर्यंत पाठवू शकलो नाही. अन्न पोहोचविण्यासाठी प्लास्टीकच्या बाटल्या सहा इंचाच्या पाईपमधून पोहोचू शकल्या नाहीत. अन्न पाठवतानाही ते अनेकदा पाईपमध्ये अडकत होते. पण, आम्ही अथक प्रयत्न करुन ते पाठविण्यात यशस्वी झालो. आता आम्ही त्यांच्यासाठी काही संत्रे, केळे यांसारखी फळे पाठवणार आहोत. सोबत काही औषधेही पुरवणार आहोत. ज्यामुळे त्यांचे आरोग्य अधिक चांगले राहील, असेही अंकुश कुलको म्हणाले.

हॉटेलला अन्नाच्या 150 पाकिटांची ऑर्डर

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना ज्या हॉटेलमधून जेवण घेण्यात आले त्या हॉटेलचे मालक अभिषेक रामोला म्हणाले, आम्ही या क्रमचाऱ्यांसाठी अन्न पुरवण्यासाठी आलेल्या सूचनेनुसार जेवणाची 150 पाकिटे पोहोचवली. आम्ही या कर्मचाऱ्यांसाठी पनीर आणि राईस बनवला. आम्ही जे काही पदार्थ बनवले आहेत. ते सर्व डॉक्टरांच्याच निगराणीखाली बनविण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

व्हिडिओ

अल्पविश्रांतीनंतर बचावकार्य पुन्हा सुरु

दरम्यान, प्राधिकरणाने सांगितले की, अडकलेल्या माणसांना वाचवण्याचे प्रयत्न पाच बाजूंनी सुरू आहेत परंतु बोगद्याच्या सिल्क्यरा टोकापासून ऑगूर मशीनद्वारे क्षैतिज ड्रिलिंग ही सर्वोत्तम पद्धत आहे. त्यासाठी अमेरिकन बनावटीचे एक मोठे ऑगर मशीन एका मोठ्या खडकावर आणण्यात आले होते. ज्यामुळे अधिक प्रमाणात कंपने तयार झाली. परिणामी बचाव कर्मचाऱ्यांच्या सुरक्षीततेमुळे ही मोहीम काही काळथांबवावी लागली. मात्र, बोगद्याच्या वरुन ड्रिलींगसह छेद देण्याचा प्रयत्न झाला. अखेर आम्ही कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलो.

देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री परिस्थितीवर नजर ठेऊन

वाचकांच्या माहितीसाठी असे की, की 12 नोव्हेंबर रोजी पहाटे भूस्खलनानंतर बोगद्याचा काही भाग कोसळा. ज्यामध्ये कामगार बोगद्यात अडकले. तेव्हापासून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. कामगार ढिगाऱ्याच्या मोठ्या ढिगाऱ्यात अडकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. उत्तरकाशीच्या जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेला सिल्क्यरा बोगदा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चार धाम रस्ता प्रकल्पाचा एक भाग आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now