Pubg Gam खेळू दिला नाही, विद्यार्थ्याने सोडले घर, मारली नदीत उडी
मात्र, अल्पावधीतच तो मोबाईलवर पब्जी गेम खेळण्याच्या आहारी गेला. त्याला रात्ररात्र जागून पब्जी गेम खेळण्याची सवय जडली होती. सध्या त्याची परीक्षा सुरु होती. मात्र, तरीही त्याचे अभ्यासाकडे लक्ष नव्हते.
Pubg Addiction: वडील रागावले आणि त्यांनी पबजी गेम (Pubg Game) खेळण्यास विरोध केला म्हणून एका विद्यार्थ्याने चक्क गंगनहर नदीत (Gangnehar River) उडी मारली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर मोटारबोटच्या सहाय्याने या विद्यार्थ्याचा शोध घेण्यात येत आहेत. प्राप्त माहितीनुसार, उत्तराखंड राज्यातील गंगनहर पोलीसस्टेशन अंतर्गत येणाऱ्या आझाद नगर येथे ही घटना घडली. रविवारी (4 मार्च) रात्री दहाच्या सुमारास विद्यार्थ्याने गंगनहर नदीत उडी घेतली.
नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, हा विद्यार्थी सातत्याने पबजी गेम खेळत असे. तो हा गेम खेळण्याच्या आहारी गेला होता. त्याच्या गेम खेळण्याच्या अतिरेकापाई त्याचे वडील त्याला रागावले. त्यांनी त्याला हा गेम खेळण्यापासून रोखले. मात्र, गेम खेळण्यास रोखल्याचा राग मनात धरुन विद्यार्थ्याने घर सोडले. त्याने थेट नदीच्या पुलावर प्रवेश केला आणि तेथून थेट नदीपात्रात उडी घेतली. (हेही वाचा, Pubg Addiction: पबजी गेम खेळण्याच्या नादात तरुण अॅसीड प्यायला; प्रकृती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु)
या विद्यार्थ्याला त्याच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वीच नवा मोबाईल घेऊन दिला होता. मात्र, अल्पावधीतच तो मोबाईलवर पब्जी गेम खेळण्याच्या आहारी गेला. त्याला रात्ररात्र जागून पब्जी गेम खेळण्याची सवय जडली होती. सध्या त्याची परीक्षा सुरु होती. मात्र, तरीही त्याचे अभ्यासाकडे लक्ष नव्हते.