IPL Auction 2025 Live

Uttarakhand: चमोली येथील नमामी गंगे प्रकल्पाच्या साईटवर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, विजेचा धक्का लागून 15 जणांचा मृत्यू

जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Uttarakhand Accident

उत्तराखंडमधील चामोली (Chamoli) येथे बुधवारी मोठी दुर्घटना घडली. येथे नमामि गंगे प्रकल्पाशी संबंधित सीवर ट्रीटमेंट प्लांटमध्ये ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. स्थानिक लोकांच्या मदतीने येथे विजेचा धक्का बसलेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मदतकार्यासाठी पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. त्याचवेळी प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले आहे. या अपघातामुळे संतप्त झालेले लोक ऊर्जा महामंडळावर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत. (हेही वाचा - COVID-19 New Guidelines: भारतात आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणार्‍यांमध्ये आता Random RT-PCR Test होणार नाही)

एसपी चमोली परमेंद्र डोवाल यांनी सांगितले की, अलकनंदा नदीच्या काठावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताबाबत उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी एएनआयला सांगितले की, "पीपलकोटीच्या चौकीच्या प्रभारीसह आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे."

पाहा व्हिडिओ -

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. खुद्द सीएम धामी देखील चमोलीला जाऊ शकतात अशी बातमी आहे. एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, "या अपघातात जखमी झालेल्या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चामोली येथे नमामि गंगे प्रकल्पाअंतर्गत एका बांधकामाधीन प्रकल्पावर काम सुरू होते, त्यादरम्यान हा अपघात झाला.