Uttar Pradesh: हॉस्टेल मधील शिक्षिकेने बनवला अश्लील व्हिडिओ, मुलींची प्रकृती बिघडल्याने खळबळ
Obscene Video

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील अलीगढ मध्ये कस्तूरबा गांधी हॉस्टेल मधील एका शिक्षेकवर अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकारानंतर शिक्षिकेने पळ काढला आहे. व्हिडिओ व्हायरल होईल याच्या भीतीने विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आहे. खरंतर शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे काही अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. तसेच शिक्षिकेने विद्यार्थ्यांना धमकावले की, याबद्दल घरातील मंडळींना सांगितल्यास त्यांना एखाद्या खोट्या प्रकरणात अडकवले जाईल.

याबद्दल जेव्हा विद्यार्थ्यांच्या पालकांना कळले असता मोठा गोंधळ उडाला आणि सर्वजण एकत्रितपणे हॉस्टेलच्या येथे पोहचले. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा तेथे धाव घेतली पण शिक्षिकेने तेथून पळ काढला होता. गुरुवारी संध्याकाळी काही विद्यार्थ्यांची याच अश्लील व्हिडिओच्या विचाराने तब्येत बिघडली.

विद्यार्थ्यांना नजीकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी म्हटले की, त्यांना विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षिकेने त्यांचे कपडे बदलताना आणि अंघोळीचे व्हिडिओसह फोटो काढले आहेत. यामुळे शिक्षेकच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा शोध घेतला जात आहे.(Haryana Suicide Case: हरियाणामध्ये एका व्यक्तीने कुटूंबातील 4 सदस्यांची केली हत्या, नंंतर स्वत:चेही संपवले आयुष्य)

शिक्षिका व्हिडिओ व्हायरल करेल का याची भीती आता सर्वांना वाटत आहे. दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी संपात व्यक्त करत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षिकेच्या मोबाईल कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आहेत हे तिलाच माहिती. पण विद्यार्थ्यांची बिघडलेली तब्येत पाहता चिंता ही व्यक्त केली जात आहे.