Uttar Pradesh: मदरसामध्ये लहान मुलांवर अमानुष अत्याचार; साखळदंडाने बांधून ठेवले पाय, Video व्हायरल

अलीगढच्या सासनी गेट परिसरातील 'मदरसा तालीमुल कुराण' मध्ये लहान मुलांना साखळदंडाने (Iron Chains) बांधून ठेवले होते

Child Abuse (Representational Image-File Image)

लहान मुलांवरील अत्याचाराची धक्कादायक छायाचित्रे यूपीच्या (UP) अलीगढमधून (Aligarh) समोर आली आहेत. अलीगढच्या सासनी गेट परिसरातील 'मदरसा तालीमुल कुराण' मध्ये लहान मुलांना साखळदंडाने (Iron Chains) बांधून ठेवले होते. मदरशात शिकण्यासाठी आलेल्या मुलांच्या पायात चक्क बेड्या घालण्यात आल्या होत्या. कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली. यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांकडे तक्रारही केली, त्यानंतर पोलीस मदरसामध्ये पोहोचले आणि आरोपी मदरसा ऑपरेटरला ताब्यात घेण्यात आले.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, मुले मदरशाच्या आत नळाजवळ पाणी पिण्यासाठी आलेली दिसतात मात्र त्यांचे पाय साखळीने बांधलेले आहेत. स्थानिक लोकांनी आरोप केला आहे की, मुलांना मदरशात बांधून ठेवले जाते, त्यांना मारहाण केली जाते. कधीकधी मदरशाच्या आतून मुलांचे ओरडणेही ऐकू येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अशी तीन मुले दिसत आहेत ज्यांचे पाय साखळदंडानी बांधले आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जेव्हा पोलीस मदरशात पोहोचले, तेव्हा तिथे एक मुलगा होता ज्याच्या पायात असे साखळदंड आढळले. व्हायरल व्हिडिओमध्ये हाच मुलगा दिसत होता. पोलिसांनी जेव्हा मदरसा ऑपरेटर फहीमुद्दीनला याबाबत जाब विचारला तेव्हा त्याने सांगितले की, मुलांना तो नाही तर त्यांचे पालकच साखळदंडाने बांधून जातात. (हेही वाचा: Auto Rickshaw Driver Saves Woman: रिक्षाचालकाने वाचवले ट्रेनखाली आत्महत्या करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीचे प्राण (Watch Video)

अलिगढ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, ज्या मुलाच्या पायाला साखळी बांधण्यात आली होती, त्याला बालकल्याण समितीकडे पाठवण्यात आले आहे. पोलीस मदरसाच्या संचालकाची चौकशी करत आहेत. मदरसाजवळ राहणाऱ्या लोकांनी आरोप केला की, त्यांना मदरशाच्या आतून मुलांच्या किंचाळ्या ऐकू आल्या होत्या मात्र जेव्हा याबाबत तक्रार केली असता, मदरसा ऑपरेटरने मुलांना मारहाण केली. मदरशाच्या आसपासच्या अनेक लोकांनी मदरसा ऑपरेटरविरुद्ध गुंडगिरीचा आरोप केला आहे.