Buffalo Resolve Ownership Dispute: हुशार म्हैस; दोन मालकांच्या मालकीचा वाद सोडवला, पंचायत पाहातच राहिली
विशेष म्हणजे हा वाद (Buffalo Dispute) ना पंचायतीला (Village Panchayat) सुटला ना पोलिसांना. हा वाद अखेर एका म्हशीने सोडवला. अर्थात त्यासाठी नामी युक्ती पोलिसांनीच (UP Police) वापरली.
म्हैस (Buffalo) सांगा कोणाची? असा एक काहीसा विचित्र वाद उत्तर प्रदेश राज्यातील प्रतापगड (Pratapgarh) येथे पाहायला मिळाला. विशेष म्हणजे हा वाद (Buffalo Dispute) ना पंचायतीला (Village Panchayat) सुटला ना पोलिसांना. हा वाद अखेर एका म्हशीने सोडवला. अर्थात त्यासाठी नामी युक्ती पोलिसांनीच (UP Police) वापरली. ज्यामुळे म्हैस मूळ मालकाकडे परत तर गेलीच पण निर्माण जालेला वादही मिटला. या प्रकरणाची पंचक्रोशीत चर्चा सुरु आहे. सदर घटना महेशगंज पोलिस स्टेशन अंतर्गत राय अस्करणपूर गावात घडली. नेमके काय घडले आणि हे प्रकरण कसे निस्तरले याची रंजक कहाणी घ्या जाणून.
पंचायतीला सुटेना वाद
प्रतापगड येथील राय अस्करणपूर गावातील रहिवासी नंदलाल सरोज यांची म्हैस बेपत्ता झाली होती. म्हशीच्या शोधार्त नंदलालने व्यापक शोधमोहीम राबवली. अखेर ही म्हैस त्याला हरिकेश येथील हनुमान सरोज याच्याकडे सापडली. त्याने म्हैस ओळखली पण ती परत द्यायला हुनमानने नकार दिला. त्यामुळे प्रकरण पंचायतीकडे गेले. प्रदीर्घ पंचाईत होऊनही दोन्ही दावेदारांनी म्हशीच्या मालकीचा दावा कायम ठेवला. दोन्ही गावच्या पंचायतींनी हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. पण तोडगा काही केल्या निघत नव्हता. अखेर प्रकरण पोलिसांकडे गेले. नंदलालने महेशगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. (हेही वाचा, Fake Ghee From Animal Fat: जनावरांच्या चरबीपासून बनावट तूप निर्मिती, भिवंडी येथील बंद कत्तलखान्यातील कारखाना उद्ध्वस्त)
म्हैस एक दावेदार दोन
दोन्ही दावेदार, पंचायत या सर्वांचे म्हणने ऐकूण घेतल्यावर अखेर महेशगंज पोलिस स्टेशनचे एसएचओ (SHO) श्रवण कुमार सिंह यांनी एक अपारंपरिक उपाय सुचवला. त्यांनी सांगितले की, म्हशीने स्वतःचा मालक ठरवावा. त्यांनी नंदलाल आणि हनुमान या दोघांनाही विरुद्ध दिशेने उभे राहण्यास सांगितले आणि म्हशीला रस्त्यावर सोडण्यात आले. गंमत अशी की, दावे सुटल्याबरोबर म्हैस जोरात उधळली आणि थेट राय अस्करनपूर गावातील नंदलाल यांच्या घरी गेली. त्यामुळे म्हैशीवर मालकी कोणाची हा वाद आपसूकच निकाली निघाला. (हेही वाचा, Mangalsutra Swallowed By Buffalo: म्हशीने गिळलं 25 ग्रॅम किमतीचं मंगळसूत्र; 2 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर मिळवलं परत, Watch Video)
पोलीस आणि पंचायतीकडून म्हैस नंदलालच्या ताब्यात देण्यात आली. तर दुसरा दावा करणाऱ्या हनुमानाला पोलीस आणि गावकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, या अनोख्या निवाड्याची चर्चा गाव-पारावर रंगली आहे. अनेकांनी हनुमानच्या दाव्याची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला नंदलालच्या हुशार म्हशीचे जोरदार कौतुकही होत आहे. काही लोकांनी या निवाड्याचे संपूर्ण श्रेय पोलिसांना आणि त्यांच्या अक्कलहुशारीला दिले आहे. दरम्यान, वाचकांच्या माहितीसाठी असे की, पाळीव प्राण्यांना आपली ठिकाणे ओळखता येतात. त्यामुळे कधी ते रस्ता चुकले तर भटकतात पण त्यांना रस्ता मिळाला की, ते पुन्हा आपल्या निश्चित ठिकाणी धाव घेतात.