Uttar Pradesh: निवडणूक कर्तव्य बजावत असताना उत्तर प्रदेशात सुमारे 700 शिक्षक ठार: प्रियंका गांधी वाद्रा 

सरकारवर सत्य लपवण्याचा आरोप करत राज्यात निवडणूक ड्यूटी (Election Duty) करणाऱ्या सुमारे 700 शिक्षकांचा मृत्यु झाला आहे ज्यात एका गर्भवती महिलेचा पण समावेश आहे असे राज्य निवडणूक आयोगावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Photo Credit: PTI

कॉंग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे पक्षाची प्रभारी प्रियंका गांधी वाद्रा ( Priyanka Gandhi Vadra)  शनिवारी सरकारवर सत्य लपवण्याचा आरोप करत राज्यात निवडणूक ड्यूटी (Election Duty) करणाऱ्या सुमारे 700 शिक्षकांचा मृत्यु झाला आहे ज्यात एका गर्भवती महिलेचा पण समावेश आहे असे राज्य निवडणूक आयोगावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर उत्तर प्रदेश सरकारचे प्रवक्ते आणि खादी ग्रामोद्योग मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी 'प्रियंका गांधी आणि कॉंग्रेस पक्ष केवळ खोट्या मदतीने राजकारण करत आहे' असे म्हणत पलटवार केले आहे. प्रियांकाने शनिवारी ट्विट केले की, 'यूपीमध्ये निवडणूक कर्तव्य करणाऱ्या सुमारे 700 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे आणि यात एका गर्भवती महिलेचा देखील समावेश आहे ज्याला निवडणूक कर्तव्य करण्यास भाग पाडले गेले'. ( Assembly Elections 2021 Results: पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी राज्याच्या विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात, पाहा मतमोजणी केंद्राबाहेरील फोटोज )

ट्विटमध्ये त्या असे ही म्हणाल्या की, 'कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या गंभीर्याचा विचार न करता उत्तर प्रदेशातील सुमारे 60,000 ग्रामपंचायतींमध्ये या निवडणुका घेण्यात आल्या. बैठका घेण्यात आल्या, निवडणूक अभियान घेण्यात आले आणि आता ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.ट्वीमध्ये त्यांनी असा आरोप केला की "ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येने मरत आहेत, जे खोटे सरकारी आकड्यांपेक्षा जास्त आहे". कॉंग्रेस सरचिटणीसम्हणाल्या , 'संपूर्ण उत्तर प्रदेशात ग्रामीण भागातील लोक आपल्या घरात मरत आहेत आणि कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीतही त्यांची गणना केली जात नाही, कारण ग्रामीण भागात कोणतीही तपासणी होत नाही.त्यांनी असेही लिहिले की, सरकारची वृत्ती सत्यावर दडपशाही करण्याचा आहे आणि तिचा जास्तीत जास्त प्रयत्न लोक-रात्रंदिवस सेवा करणार्‍या वैद्यकीय समुदायाला धमकावणे आहे.

कॉंग्रेस सरचिटणीसांनी एका ट्विटमध्ये लिहिले की, "उत्तर प्रदेशात काय घडत आहे हे मानवताविरूद्ध गुन्ह्यापेक्षा काही कमी नाही आणि राज्य निवडणूक आयोग त्यात सहभागी आहे." उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षक संघाने जाहीर केलेल्या मृत शिक्षकांची यादीही त्यांनी आपल्या ट्विटद्वारे शेअर केली आहे . शनिवारी सायंकाळी जाहीर केलेल्या निवेदनात उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, प्रियंका गांधी आणि संपूर्ण कॉंग्रेस पक्ष केवळ खोट्या आणि फसव्याच्या मदतीने राजकारण करीत आहे, ही त्यांची जुनी सवय आहे आणि ट्विटरवर उत्तर प्रदेश सरकारवर वारंवार आरोप करणे हा कॉंग्रेसच्या जुन्या आणि आवडत्या राजकारणाचा भाग आहे.

ते म्हणाले की सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशमधील पंचायत निवडणुकांच्या मतमोजणीचे आदेशही दिले आहेत आणि योगी सरकारच्या उत्तरावर कोर्टाचे समाधान आहे, कारण योगी सरकार कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण करीत आहे, त्यामुळे प्रियांकाला अशा प्रकारे वक्तृत्व करणे योग्य ठरत नाही. ते म्हणाले की, कॉंग्रेसने आधी आपल्याकडे लक्ष द्यावे व त्यांचे सरकार कोठे आहे ते पाहिले पाहिजे. कॉंग्रेस केवळ हरवलेली जागा शोधण्यासाठी असे आरोप आणि वक्तव्य करीत आहे. गेल्या 70 वर्षात कॉंग्रेस सरकारने फक्त खोटारडे राजकारण केले असा आरोप सिंह यांनी केला. ते म्हणाले की ,प्रियंका देखील मजबूर आहेत कारण इतकी वर्षे सत्तेत राहिल्यानंतरही त्यांच्या पक्षाने काही केले नाही आणि त्यामुळे तिच्याकडे आता खोट्या गोष्टीचा अवलंब करण्याशिवाय दूसरे काय आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement