UPSC Chairperson Manoj Soni Resigns: यूपीएससी अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा; पूजा खेडकर प्रकरण भोवल्याची चर्चा

महत्त्वाचे असे की, पाच वर्षांच्याय कार्यकाळावर नियुक्त असलेल्या सोनी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा नियोजित कार्यकाळ सन 2029 पर्यंत आहे.

UPSC Chairperson Mmanoj Soni | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चे अध्यक्ष मनोज सोनी (Manoj Soni Resigns) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. महत्त्वाचे असे की, पाच वर्षांच्याय कार्यकाळावर नियुक्त असलेल्या सोनी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा नियोजित कार्यकाळ सन 2029 पर्यंत आहे. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यापाठीमागे 'वैयक्तिक कारण' इतकीच माहिती सध्या पुढे येत आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नसल्याचे समजते. देशभर गाजत असलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणानंतर हा राजीनामा आल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

एक महिन्यापूर्वीच राजीनामा?

मनोज सोनी यांनी 2017 मध्ये UPSC सदस्य म्हणून त्यांचा प्रवास सुरू केला आणि 16 मे 2023 रोजी त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. सोनी यांनी भारताच्या राष्ट्रपतींकडे जवळपास एक महिन्यापूर्वी राजीनामा सादर केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांन सूत्राच्या हवाल्याने दिले आहेत. तथापि, राजीनामा स्वीकारला जाईल की नाही आणि त्यांना त्यांच्या कर्तव्यातून औपचारिकरीत्या केव्हा मुक्त केले जाईल हे स्पष्ट नाही. (हेही वाचा, FIR Against IAS Puja Khedkar: प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्यावर कारवाई; UPSC ने दाखल केला FIR; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा)

UPSC वादाच्या भोवऱ्यात

केंद्रीय लोकसेवा आयोग आपल्या निकोप आणि पारदर्शी नोकरभरतीसाठी प्रसिद्ध आहे. तिच त्यांची ओळख आहे. मात्र, पाठिमागील काही काळात UPSC उमेदवारांवरील रोजगार सुरक्षित करण्यासाठी फसवी प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप झाला. त्या अनुशंघाने काही प्रकरणेही पुढे आली. ज्यामुळे UPSC जोरात चर्चेत आली. या प्रकरणांच्या वादामुळे तर सोनी यांनी राजीनामा दिला नसेल ना? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. (हेही वाचा, Viral Video: वेळ हुकली, UPSC च्या उमेदवाराला नाकारले, परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालक ढसाढसा रडले)

पूजा खेडकर प्रकरण भोवले?

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावरील आरोपांमुळे UPSC चर्चेत आहे, ज्यांनी नागरी सेवांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी ओळखपत्रांची बनावट केली होती. या घटनेमुळे उमेदवारांनी आरक्षित लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रे खोटी केल्याच्या अनेक घटनांबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमधील स्वामीनारायण संप्रदायाशी संलग्न असलेल्या अनुपम मिशन या संस्थेला अधिक वेळ देण्याचे सोनीचे उद्दिष्ट आहे. 2020 मध्ये दीक्षा (दीक्षा) प्राप्त केल्यानंतर, सोनी यांनी मिशनमध्ये स्वतःला भिक्षू किंवा निष्काम कर्मयोगी (निःस्वार्थ कार्यकर्ता) म्हणून वचनबद्ध केले. आता त्यासाठी वेळ देण्याचा त्यांचा विचार आहे.

नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय

मनोज सोनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ठ म्हणून ओळखले जातात. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी सोनी यांना 2005 मध्ये वडोदरा येथील MS विद्यापीठाचे सर्वात तरुण कुलगुरू म्हणून नियुक्त केले. जून 2017 मध्ये UPSC मध्ये सामील होण्यापूर्वी, त्यांनी दोन विद्यापीठांमध्ये तीन वेळा कुलगुरू म्हणून काम केले. गुजरातमध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ (BAOU) मधील दोन पदांवरही ते होते.

UPSC ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 315-323 अंतर्गत स्थापन केलेली घटनात्मक संस्था आता अध्यक्षांसह सात सदस्यांसह कार्यरत आहे. केंद्र सरकारच्या वतीने नागरी सेवा परीक्षांसह विविध परीक्षा आयोजित करण्यात आणि IAS, IFS, IPS आणि केंद्रीय सेवांमधील प्रतिष्ठित पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आयोगाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.