Upcoming IPO in Indian Stock Market: या आठवड्यात सूचीबद्ध होणारे आयपीओ, शेअर बाजारात उत्सुकता; घ्या जाणून

पाठिमागील अनेक वर्षांच्या इतिहासात निफ्टीने प्रथमच 20,000 अंकांचा टप्पा पार केला. त्यासोबत पाठिमागील काही दिवसांमध्ये खास करुन स्मॉलकॅप कंपन्यांनीही स्टॉक मार्केटमध्ये काहीशी दमदार कामगिरी केली.

Stock Market | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Indian Stock Market News: भारतीय शेअर बाजार चढ-उतार आणि गुंतवणूक यामध्ये तुम्ही जर काहीशी अधिक ऋची ठेवत असाल तर ही माहिती आपल्यासाठी आहे. पाठिमागील अनेक वर्षांच्या इतिहासात निफ्टीने प्रथमच 20,000 अंकांचा टप्पा पार केला. त्यासोबत पाठिमागील काही दिवसांमध्ये खास करुन स्मॉलकॅप कंपन्यांनीही स्टॉक मार्केटमध्ये काहीशी दमदार कामगिरी केली. या पार्श्वभूमीवर आता येत्या आठवड्यात काही नवे आयपीओ सूचिब्ध होऊ घातले आहेत. यात वैभव ज्वेलर्स पासून ते मधूसुधन मसाले पर्यंतच्या समभागांचा समावेश आहे. जाणून घ्या येत्या आठवड्यात सूचिबद्ध होणारे (Upcoming IPO) आयपीओ.

Signature Global IPO:

सिग्नेचर ग्लोबल IPO मेनबोर्ड इश्यू 20 सप्टेंबर रोजी उघडेल आणि 22 सप्टेंबर रोजी बंद होईल. आयपीओच्या माध्यमातून कंपनीने 603 कोटी किमतीच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि त्याच्या शेअरहोल्डर इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनने ₹127 कोटी किमतीच्या शेअर्सची ऑफर ऑफ सेल (OFS) समाविष्ट केली आहे.

Madhusudan Masala IPO:

स्वदेशी उत्पादकाचा मोठा ब्रँड अशी ओळख असलेला मधुसूदन मसाला SME IPO 21 सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल. IPO इश्यूमध्ये 34 लाख ताज्या इक्विटी शेअर्सची विक्री समाविष्ट असून, प्रत्येकाचे दर्शनी मूल्य रु. 10 इतकी आहे. याची नोंदणी 21 सप्टेंबर रोजी बंद होईल.

हाय-ग्रीन कार्बन IPO

हाय-ग्रीन कार्बन SME IPO 21 सप्टेंबर 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 25 सप्टेंबर 2023 रोजी बंद होईल. हाय-ग्रीन कार्बन IPO हा ₹52.80 कोटींचा बुक बिल्ट इश्यू आहे.

Vaibhav Jewellers IPO:

ज्वेलरी आणि सोने विश्वात सक्रीय असलेल्या आंध्र प्रदेशस्थित मनोज वैभव जेम्स एन ज्वेलर्सचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी 22 सप्टेंबरपासून उघडत आहे. ज्यामध्ये सार्वजनिक इश्यूमध्ये 210 कोटी रुपयांपर्यंचे इक्विटी शेअर्स आणि ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे. आयपीओसाठी नोंदणी 26 सप्टेंबर रोजी होईल.