उत्तर प्रदेश: धक्कादायक! मेरठ येथे डिजे चा आवाज करत शेजरच्या अल्पवयीन मुलीवर तरुणाकडून बलात्कार

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मेरठ जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मेरठ जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. असे सांगितले जात आहे की, एका तरुणाने आपल्या घरी डिजे चा मोठा आवाज करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे बलात्कार करताना मुलीचा ओरडण्याचा आवाज ही कोणाला ऐकू आला नाही. यामध्ये अत्यंत विचित्र गोष्ट म्हणजे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कारवाई करण्याऐवजी अल्पवयीन मुलीच्या भावाला ताब्यात घेतले आहे. या कारणामुळे पीडितेच्या नातेवाईकांनी एसएसपी कार्यालयाच्या येथे जोरदार आंदोलन केले.

नातेवाईकांनी याबद्दल हल्लाबोल केल्यानंतर आरोपीच्या विरोधात खटला दाखल तरत त्याचा तपास सुरु केला आहे. खरंतर इंचौली थाना क्षेत्रात राहणारा एक तरुण मजुरीचे काम करत घर चावलतो. असे सांगितले जात आहे की, मंगळवारी मुलीचे आई-वडील शेतात काम करण्यास गेले होते. त्यावेळी मात्र त्यांची 16 वर्षीय मुलगी घरीच होती. त्याचवेळी अचानक शेजारी राहणारा विशु चौधरी या तरुणाने त्याच्या घरातील ट्रॅक्टरवर जोरदार डिजे वाजवण्यास सुरुवात केली.(UP Rape Shocker: पन्नास वर्षीय महिलेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, गुप्तांगासह शरीरावर असंख्य जखमा; अवयव तुटल्याचाही शवविच्छेदन अहवालात खुलासा)

त्यानंतर विशु याने घराच्या भिंतीवर उडी घेत बाजूच्या घरात घुसला. त्यावेळी घरात एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीवर आत्महत्या केली. मुलीने ओरडण्याचा ही प्रयत्न केला. परंतु डिजे वाजत असल्यामुळे तिचा आवाज कोणालाच ऐकू आला नाही. हे कृत्य केल्यानंतर तरुणाने घटनास्थळावरुन पळ काढला. तर पीडितेची वैद्यकिय चाचणी आणि आरोपीला अटक करण्याचे आदेश पोलिसांकडून दिले गेले आहेत.