Lesbian Lover सोबत राहण्यासाठी लिंग बदलणाऱ्या महिलेची तांत्रिकाकडून हत्या; उत्तर प्रदेशातील घटना

लेस्बीअन पार्टनर सोबत राहण्यासाठी लिंग बदल करु पाहणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेची हत्या झाली आहे. एका तांत्रिकावर (Tantrik) या महिलेच्या हत्येचा आरोप आहे. सदर महिलला लिंग बदलून घ्यायचे होते. या महिलेच्या इच्छेचा गैरफायदा घेत तांत्रिकाने तिला लिंग बदलून देण्याचे आमिष दाखवले. त्यातूनच त्याने तिची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Lesbian | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

लेस्बीअन पार्टनर सोबत राहण्यासाठी लिंग बदल करु पाहणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेची हत्या झाली आहे. एका तांत्रिकावर (Tantrik) या महिलेच्या हत्येचा आरोप आहे. सदर महिलला लिंग बदलून घ्यायचे होते. या महिलेच्या इच्छेचा गैरफायदा घेत तांत्रिकाने तिला लिंग बदलून देण्याचे आमिष दाखवले. त्यातूनच त्याने तिची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आरसी मिशन पोलीस स्टेशन (RC Mission Police Station) हद्दीत राहणाऱ्या प्रिया (वय 30) आणि प्रीती (वय 24) यांच्यात मैत्री होती. दोघींचे एकमेकींशी समलिंगी संबंध (Same-Sex Relationship) होते. प्रियाला लिंग बदलून घ्यायचे होते आणि त्यातूनच ती तांत्रिकाच्या नादी लागली, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयला पोलिस अधीक्षक एस आनंद यांनी दिली.

पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, प्रिया आणि प्रिती यांच्यातील संबंध जाहीर झाले. त्यामुळे प्रितीच्या लग्नाला अडथळे येऊ लागले. त्यामुळे चिडलेल्या प्रितीची आई उर्मिलाने कथितरित्या मोहम्मदी भागातील रहिवासी असलेल्या रामनिवास या तांत्रिक (मंत्रतंत्रज्ञ) याची भेट घेतली आणि प्रियाच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी पुढे सांगितले की, मात्रिकाला भेटायला गेल्याव प्रीतीने तांत्रिकाला सांगितले होते की प्रियाला पुरुष बनायचे आहे. याचा फायदा घेत प्रीतीच्या आईने तांत्रिकाला प्रियाला मारण्यासाठी दीड लाख रुपये देण्याचे वचन दिले. ही एक प्रकारे हत्येची सुपारीच होती. (हेही वाचा, Lesbian Partner Detained By Parents Case: लेस्बियन पार्टनरला कुटुंबीयांनी जबरदस्तीने केले विलग, तरुणीची हायकोर्टात याचिका)

प्रितिची आई आणि तांत्रिक यांच्यात ठरलेल्या कटानुसार तांत्रिकाने प्रीतीला विश्वासात घेतले. तिचे लिंग बदलवून देतो असा विश्वास दिला. नंतर प्रितीने मोठ्या विश्वासाने प्रियाला बोलावले आणि तांत्रिक तिचे लिंग बदलेल असे सांगितले. प्रितिने विश्वासाने बोलावल्यानंतर प्रिया 13 एप्रिल रोजी घरातून निघून गेली होती आणि तेव्हापासून ती बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी 18 एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, तपासात आढळून आले की प्रियाने प्रीती आणि तांत्रिक रामनिवास यांच्याशी बोलणे केले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रामनिवासला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पोलिसांना सांगितले की प्रियाला "तिचे रूपांतर पुरुषात करण्याच्या बहाण्याने जंगलात नेले आणि तिला डोळे मिटून नदीच्या काठावर झोपण्यास सांगितले". दरम्यान, त्याने चाकुने प्रियाचा गळा चिरला.

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement