Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

Journalist Killed in UP's Sitapur: सीतापूरमध्ये 36 वर्षीय पत्रकाराची गोळ्या घालून हत्या करण्यात (Sitapur Journalist Murder) आली. शनिवारी दुपारी, दुचाकीस्वार हल्लेखोरांनी त्याच्या दुचाकीला धडक दिली. तीन राउंड गोळीबार केला आणि तेथून पळून गेले. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले. मात्र, या घटनेत राघवेंद्र याचा मृत्यू झाला. पोलिसांनी राघवेंद्रला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले. राघवेंद्र यांच्या छातीत आणि खांद्यावर गोळी लागली होती. त्याच्या कपड्यांमध्ये एक गोळी अडकलेली आढळली. हल्लेखोरांना पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. Amroha: आमरोमध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत वृद्धाची हत्या, 2 जण गंभीर जखमी

ही घटना इमालिया सुलतानपूर पोलिस स्टेशन परिसरात घडली. पत्रकार राघवेंद्र बाजपेयी हे महोली शहरातील रहिवासी होते. लखनऊ-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील हेमपूर रेल्वे क्रॉसिंगजवळील ओव्हर ब्रिजवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी राघवेंद्रवर गोळीबार केला. त्याच्या खांद्यावर आणि छातीवर तीन गोळ्या लागल्या. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले.

हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोरांना ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, 10 दिवसांपूर्वी त्याला धमकी मिळाली होती. कुटुंबातील सदस्य म्हणाले, शनिवारी दुपारी राघवेंद्र यांना कोणाचा तरी फोन आला. बोलून झाल्यावर, राघवेंद्र त्याच्या सायकलवरून घराबाहेर पडला. काही वेळाने राघवेंद्रला गोळी लागल्याची माहिती मिळाली. कुटुंबियांनी दावा केला की, राघवेंद्र यांना त्यांच्या बातम्यांसाठी 10 दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतर ही घटना घडली.