UP Shocker: सेक्स एनर्जी गोळ्या घेऊन तरुणीवर जबरदस्तीने क्रूरपणे बलात्कार; रक्तस्त्राव होऊन मुलीचा मृत्यू
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पुष्टी केल्यानुसार मुलीच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत रॉडसारख्या वस्तूमुळे झाली असावी.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) उन्नावमध्ये (Unnao) एका दलित मुलीवर बलात्कार (Rape) करून तिची निर्घृण हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. तरुणीच्या प्रियकरानेच हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. तरुणीने तिच्या प्रियकराला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून घरी बोलावले होते. वाटेत आरोपीने शिलाजितचा डोस घेतला. त्यानंतर तरुणीच्या घरी पोहचल्यावर त्याने अतंत्य क्रूरपणे आणि जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान मुलीच्या गर्भाशयाला इजा झाली आणि खूप रक्त वाहू लागले.
मुलीची ही अवस्था पाहून प्रियकर घाबरला व तिला तिथेच सोडून तो पळून गेला. त्यानंतर थोड्या वेळाने मुलीचा मृत्यू झाला. रामबरन असे आरोपी मुलाचे नाव आहे. त्याच्या म्हणण्यानुसार शेअर चॅट अॅपच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली होती. एक वर्षांपासून ते दोघे एकत्र होते. नातेवाईकांना कळू नये म्हणून ते फक्त मेसेजद्वारेच बोलायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान रामबरन उर्फ राजने विद्यार्थिनीवर त्याचे प्रेम असल्याचे कबूल केले.
त्याने पोलिसांना सांगितले की, त्याला मुलीला मारायचे नव्हते. मुलीला रक्तस्त्राव होऊ लागल्यावर तो औषध आणण्यासाठीही गेला होता परंतु तिथे त्याल दवाखान्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपाशी संबंधित अन्य घटना उघडकीस आल्यास त्याच्यावरील कलमे वाढविण्यात येणार आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या फोनवर आणखी काही मुलींच्या चॅट्स सापडल्या आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. (हेही वाचा: Crime: धक्कादायक ! मोबाईल देण्याच्या बहाण्याने शिक्षकाकडून 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार)
दुसरीकडे, डॉक्टरांचा असा विश्वास आहे की शक्तिवर्धक औषधांचा ओव्हरडोज घेतल्याने दुखापत होऊ शकते, परंतु जास्त रक्तस्त्राव होऊ शकत नाहीत. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पुष्टी केल्यानुसार मुलीच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत रॉडसारख्या वस्तूमुळे झाली असावी. मुलीच्या हत्येबाबत पोलिसांनी केलेल्या खुलाशावर मृत मुलीच्या वडिलांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की बलात्कारामुळे कदाचित मृत्यू होऊ शकतो, परंतु अशी जखम होऊ शकत नाही.