UP Shocker: कानपूर देहात जिल्ह्यात अवघ्या 7 वर्षांच्या मुलाने केला 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; तक्रार दाखल, तपास सुरु
पाच वर्षीय मुलीच्या आईने सांगितले की, ही घटना घडली तेव्हा त्यांची मुलगी खेळण्यासाठी बाहेर गेली होती.
उत्तर प्रदेशच्या कानपूर देहात (Kanpur Dehat) जिल्ह्यात बलात्काराची (Rape) धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका सात वर्षांच्या मुलाने आपल्या शेजारच्या पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. याबाबत मंगळवारी मुलीच्या आईद्वारे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून भादंवि कलम 376 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 5/6 अन्वये एफआयआर दाखल केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
दोन्ही मुलांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून वैद्यकीय अहवालात बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच वर्षीय मुलीच्या आईने सांगितले की, ही घटना घडली तेव्हा त्यांची मुलगी खेळण्यासाठी बाहेर गेली होती.
अकबरपूर कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश सिंह म्हणाले की, पोलीस या प्रकरणाचा सावधगिरीने आणि संवेदनशीलरित्या तपास करत आहेत. सात वर्षांखालील मुलाने गुन्हा केला तर तो गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही. असे असले तरी कायदेशीर अभिप्राय घेऊनच याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल. (हेही वाचा: Jharkhand: गर्लफ्रेंडने ब्लेडने कापला प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट; पीडित तरुणाची प्रकृती चिंताजनक)
दरम्यान, याआधी विरारमधूनदेखील बलात्काराचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले होते. या ठिकाणी डॉक्टर-डॉक्टर खेळण्याच्या बहाण्याने एका तरुणाने 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. आरोपीने स्वतःचे वय 17 वर्षे असल्याचे सांगितले. मात्र, तपासात तो 18 वर्षांचा असल्याचे समोर आले. या प्रकरणात एका 15 वर्षांच्या मुलीनेही त्याला साथ दिली, त्यामुळे पोलीस तिचाही शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.