उत्तर प्रदेश समाजवादी पक्षाचे नेते छोटे लाल दिवाकर आणि मुलगा सुनील यांची गोळ्या घालून हत्या; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) नेते छोटे लाल दिवाकर आणि त्याचा मुलगा सुनील यांचा गोळ्या घालून ठार केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

SP Leader Chhote Lal Diwakar & His Son Dead (Photo Credits: Twitter)

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) नेते छोटे लाल दिवाकर आणि त्याचा मुलगा सुनील यांचा गोळ्या घालून ठार केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. प्राप्त माहितीनुसार संभळ (Sambhal)  जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. मनरेगाच्या (MGNREGA) निधीतून गावात बनविण्यात येत असलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी छोटेलाल आणि त्याचा मुलगा गेले होते.यावेळी त्यांना भर रस्त्यात गोळ्या मारून ठार करण्यात आले. या घटनेचा एक व्हिडीओ सुद्धा शूट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या रिचा सिंग यांनी हा व्हिडीओ शेअर करून ट्विट केले आहे, भर दिवसा हा प्रकार घडला आहे आणि यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयी प्रश्नच आहे. अयोध्येत भाजपा नेते जय प्रकाश सिंह यांची गोळी घालून हत्या

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे दिवाकर आणि त्यांचा मुलगा सुनील यांचा गावातील दोन गुंडांशी वाद झाला. ज्याठिकाणी दिवाकर कामाची पाहणी गेले होते आपले शेत असल्याचे या गावगुंडांचे म्हणणे होते, या दोघांकडे रायफल होत्या. जसा वाढ वाढू लागला तास त्या दोघांनी कसलाही विचार न करता दिवाकर आणि त्यांच्या मुलावर गोळीबार केला. या गोळीबारात दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अद्याप कोणतीही अटक झालेली नाही.

दरम्यान, छोटे लाल दिवाकर हे चंदौसी विधानसभा मतदारसंघातील नेते होते. यंदाच्या निवडणुकीत ही जागा काँग्रेससाठी देण्यात आल्याने त्यांना निवडणूक लढवता आली नव्हती. सध्या ते या भागात पक्षाचे प्रभारी म्ह्णून काम पाहत होते.