UP Rape Shocker: पन्नास वर्षीय महिलेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, गुप्तांगासह शरीरावर असंख्य जखमा; अवयव तुटल्याचाही शवविच्छेदन अहवालात खुलासा
येथे रविवारी संध्याकाळी आंगणवाडी सेचिका असणारी ही महिला जवळच्या मंदिरात पूजेसाठी गेली होती, यानंतर ती परत आलीच नाही.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बदायूं (Badaun) येथे निर्भया प्रकरणाची पुनरावृती झाली आहे. येथे एक 50 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार (Gangrape) करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर पीडितेच्या पोस्टमार्टम अहवालातून समोर आलेली माहिती ऐकून कोणाचाही संताप अनावर होईल. या अहवालानुसार, महिलेच्या गुप्तांगामध्ये रॉडसारखी गोष्ट घालण्यात आली, ज्यामुळे तिच्या प्रायव्हेट पार्टसना गंभीर दुखापत झाली. तिची डावी बरगडी, डावा पाय तुटला आहे आणि डाव्या फुफ्फुसालाही जोरदार मार बसला आहे. या ठिकाणी तिच्यावर एखाद्या जड गोष्टीने हल्ला केला असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक रक्तस्त्राव आणि धक्का यामुळे महिलेचा मृत्यू झाला.
ही घटना उघैती पोलिस स्टेशन परिसरातील एका खेड्यातील आहे. येथे रविवारी संध्याकाळी आंगणवाडी सेचिका असणारी ही महिला जवळच्या मंदिरात पूजेसाठी गेली होती, यानंतर ती परत आलीच नाही. स्थानिकांचा असा आरोप आहे की रात्री 12 वाजेच्या सुमारास एका कारमधून आलेले चालक आणि इतर दोन पुरुषांनी जखमी अवस्थेतील या महिलेस सोडून पळून गेले. रात्री महिलेचा मृत्यू झाला. सामूहिक बलात्कारानंतर कुटूंबाच्या अपीलनुसार पोलिसांनी आरोपी महंत याच्यासह त्याचा एक शिष्य व ड्रायव्हरवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेनंतर एसएसपीने तातडीने एसपीला घटनास्थळी पाठविले. आरोपींना पकडण्यासाठी 5 टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. घटनेनंतर पीडितेचा मृतदेह 44 तासांनंतर पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला. अशा परिस्थितीत पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात उशीर केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली आणि मंगळवारी महिलेचे पोस्टमार्टम झाले. अशा या सामूहिक बलात्कार आणि नंतर खून प्रकरणात मोठी कारवाई करत, या घटनेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल उघैतीचे पोलिस स्टेशन प्रभारी राघवेंद्र यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, पीडितेच्या कुटूंबाला आवश्यक त्या वस्तू पुरवण्याच्या सूचना डीएम यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर राणी लक्ष्मीबाई नारी सन्मान योजनेंतर्गत कुटुंबियांना दहा लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. यासह पीडित महिलेच्या दोन्ही अल्पवयीन मुलींची कन्या सुमंगला योजनेंतर्गत नोंद करून त्यांना आवश्यक मदतीचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर विभागाने विम्याचे पैसे लवकरात लवकर दिले जातील असेही सांगितले.