लग्नाच्या मांडवात रक्तपात! अँगल आवडला नाही म्हणून व्हिडीओग्राफरची हत्या
फिरोझाबाद (Firozabad) येथे गुरुवारी 27 फेब्रुवारी रोजी एक लग्न समारंभ पार पडत होता, दिनेश कुमार, रोहित कुमार आणि सत्येंद्र कुमार हे व्हिडीओग्राफर्स वरात लग्नमंडपात पोहचत असतानाच खुर्चीवर उभे राहून व्हिडीओ शूटिंग सुरु होते पण यावेळी व्हिडीओ कॅमेऱ्याचा अँगल चुकला आणि ही चूक या साऱ्यांच्या जीवावरच बेतली.
लग्नासारख्या मंगलमयी प्रसंगी रक्तपात घडल्याची धक्कदायक घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथे घडली आहे, या हत्येचे कारण एक शुल्लक कॅमेरा अँगल होते. फिरोझाबाद (Firozabad) येथे गुरुवारी 27 फेब्रुवारी रोजी एक लग्न समारंभ पार पडत होता, दिनेश कुमार, रोहित कुमार आणि सत्येंद्र कुमार हे व्हिडीओग्राफर्स वरात लग्नमंडपात पोहचत असतानाच खुर्चीवर उभे राहून व्हिडीओ शूटिंग सुरु होते पण यावेळी व्हिडीओ कॅमेऱ्याचा अँगल चुकला आणि ही चूक या साऱ्यांच्या जीवावरच बेतली. व्हिडिओचा अँगल आवडला नाही म्ह्णून नशेने धुंद झालेल्य एका व्यक्तीने चक्क गोळ्या झाडून व्हिडीओग्राफरची हत्या केल्याचे समजत आहे. रोहित कुमार असे ठार झालेल्या व्हिडीओग्राफरचे नाव असून तो अवघा 20 वर्षांचा होता. जैन, गुजराती व सिंधी समाजाकडून Pre Wedding Shoot तसेच लग्नातील कोरिओग्राफीवर बंदी; जाणून घ्या कारण
पोलिसांच्या माहितीनुसार,सत्येंद्र यादव असे गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे त्याने त्याच्या जवळ असणाऱ्या डबल बॅरल शॉटगनमधून व्हिडीओग्राफी करणाऱ्या टीमवर दोन गोळया झाडल्या. यात दोन जण जखमी झाले. मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे एका सदस्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याच्या प्रकृतीमध्ये प्रथमोपचारानंतर सुधारणा झाली आहे. गोळीबार केल्यावर सत्येंद्र यादव घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
दरम्यान, मृत रोहितच्या नातेवाईकांनी कॅमेरा टीम मधील सदस्याच्या माहितीवरून सत्येंद्र यादव याच्याविरोधात कलम 304 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सत्येंद्र यादवने बंदुकीतून दोन गोळया झाडल्या असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही.