युपी: बुलंदशहर येथील मंदिरातील साधुंची गळा दाबुन हत्या; आरोपींंना अटक

उत्तर प्रदेशातील (UP) बुलंदशहर (Bulandshehar) येथील एका मंदिरातील दोन पुजाऱ्यांची मंदिरातच हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

Two Priests Murdered in UP (Photo Credits: ANI)

पालघर (Palghar) मध्ये चोर समजून दोन साधू आणि ड्रायव्हर यांची हत्या झाल्यानंतर पेटलेल्या वातावरणात आता आणखीन एक धक्कादायक खळबळजनक प्रकरण समोर येत आहे. यावेळेस उत्तर प्रदेशातील (UP) बुलंदशहर (Bulandshahar)  येथील एका मंदिरातील दोन पुजाऱ्यांची मंदिरातच हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पागोना गावातील शिव मंदिर परिसरात ही घटना घडली असून मंदिराच्या कंपाउंड मध्ये या पुजार्‍यांचे मृतदेह आढळून आले होते. हे दोन्ही पुजारी मागील 10 वर्षांपासून या मंदिरात काम करत होते. काही दिवसांपूर्वी या पुजाऱ्यांकडील चिमटा काही व्यसनींनी पळवून नेला होता या प्रकारची तक्रार करताच याच व्यसनींनी पुजाऱ्यांचा गळा दाबून अत्यंत निर्घृण पद्धतीने त्यांची हत्या केली आहे. याप्रकरणी तपास करताना पोलिसांना त्वरित या आरोपींना अटक केली आहे. Palghar Mob Lynching Case: पालघर मधील तिहेरी हत्याकांड प्रकरण CID कडे सोपवले

या घटनेत मृत पावलेल्या साधूंपैकी सेवादास हे अवघे 35 वर्षीय होते तर अन्य पुजारी साधू जगनदास हे 55 वर्षीय होते. एका साध्य बदलाच्या भावनेतून या पुजाऱ्यांची व्यसनी तरुणांनी हत्या केली आहे. या घटनेवर अनेक राजकीय मंडळींनी सुद्धा तीव्र शब्दात प्रतिक्रया दिल्या आहेत तर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी याप्रकरणात चौकशी व्हावी मात्र कोणीही यास धार्मिक वळण देऊ नये अशी विनंती केली आहे.

पहा ट्विट

प्रियंका गांंधी ट्वीट

दरम्यान दोन्ही पुजाऱ्यांचे मृतदेश सध्या पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आले आहेत, याप्रकरणी पुढील तपास सुरु आहेत. मात्र अलीकडेच पालघर मध्ये घडलेल्या प्रसंगानंतर याला गंभीर वळण दिले जाण्याची पूर्ण शक्यता आहे.