Unlock 3.0 Guidelines: केंद्र सरकारने जाहीर केली अनलॉक 3 ची मार्गदर्शक तत्त्वे; देशात 5 ऑगस्ट पासून सुरु होणार जिम, सिनेमा हॉलवरील बंदी कायम, जाणून घ्या सविस्तर
त्यानंतर अनलॉक (Unlock) द्वारे हळू हळू व्यवसाय, उद्योगधंदे सुरु करण्यात आले.
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) मध्ये देशातील जवळजवळ सर्व गोष्टींवर रोख लावण्यात आली होती. त्यानंतर अनलॉक (Unlock) द्वारे हळू हळू व्यवसाय, उद्योगधंदे सुरु करण्यात आले. मात्र अनेक दिवसांपासून व्यायामशाळांबाबत (Gym) निर्णय होत नव्हता. आता केंद्र सरकारने मोठा दिलासा देत देशातील जिम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. गृह मंत्रालया (MHA) ने अनलॉक 3 (Unlock 3) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे, त्याद्वारे रात्रीच्या वेळी व्यक्तींच्या हालचालीवरील निर्बंध हटविले गेले आहेत. तसेच योग संस्था (Yoga Institutes) आणि व्यायामशाळा (Gymnasiums) 5 ऑगस्ट 2020 पासून उघडण्यास परवानगी दिली आहे. अनलॉक 3 मार्गदर्शक तत्त्वे 1 ऑगस्ट पासून लागू होतील
केंद्र सरकारने यावेळी अनलॉक 3 मध्ये कंटेनमेंट झोनच्या बाहेर आणखी काही गोष्टी सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. मात्र, गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार-
पहा एएनआय ट्वीट -
- 31 ऑगस्ट 2020 पर्यंत सर्व कंटेनमेंट झोनमध्ये कडक लॉकडाऊन राहील. 5 ऑगस्ट 2020 पासून रात्र कर्फ्यू असणार नाही.
- 5 ऑगस्ट 2020 पासून सर्व योग संस्था आणि व्यायामशाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रियेचे (SOP) पालन करणे बंधनकारक असेल.
- 31 ऑगस्ट 2020 पर्यंत शाळा, महाविद्यालये आणि सर्व शैक्षणिक संस्था बंद राहतील. ऑनलाइन शिक्षण पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. शैक्षणिक गोष्टी कधी सुरु करायच्या याबाबत पुढे वेगळ्या सुचना जारी केल्या जातील.
- सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, सभागृह, असेंब्ली हॉल आणि अशा सर्व ठिकाणी बंदी असेल.
- गृहमंत्रालयाने दिलेल्या मंजुरीशिवाय सर्व प्रकारची आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असतील. तसेच मेट्रो रेल्वे सेवांवरही निर्बंध कायम राहतील.
- सामाजिक/राजकीय/खेळ/करमणूक/शैक्षणिक/सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या उत्सवांवरील बंदी कायम असणार आहे. (हेही वाचा: New Nationa Education Policy 2020: केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाचे सूत्र 5+3+3+4)
दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका आणि पंचायत स्तरावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यादरम्यान, सामाजिक अंतरांच्या नियमांचे पालन करणे आणि मास्क लावणे बंधनकारक असेल, असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.