Union Home Minister Amit Shah Discharged From AIIMS: गृहमंंत्री अमित शाह यांंना एम्स रुग्णालयातुन डिस्चार्ज
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांंना आज AIIMS रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांंना आज AIIMS रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शाह यांंनी कोरोनावर (Coronavirus) मात केल्यावर त्यांंना काही दिवस पोस्ट कोविड केअर (Post COVID Care) साठी एम्स मध्ये ठेवण्यात आले होते येथुन 30 ऑगस्ट रोजी त्यांंना डिस्चार्ज देण्यात आला. यानंंतर 13 सप्टेंबर रोजी त्यांंना पुन्हा श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने पुन्हा संपुर्ण मेडिकल तपासणी साठी रुग्णालयात दाखल केले गेले होते अखेरीस आज शाह यांंना डिस्चार्ज मिळाला आहे. शाह यांंची प्रकृती सध्या ठणठणीत असल्याचे समजत आहे. Nitin Gadkari Tested Coronavirus Positive: केंद्रीय मंंत्री नितिन गडकरी यांंना कोरोनाची लागण, पहा ट्विट
प्राप्त माहितीनुसार, गेल्या दीड महिन्यात शाह यांंना तीन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शाह यांंना मागील महिन्यात म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती, ज्या संदर्भात स्वतः ट्विट करुन त्यांंनी माहिती दिली होती त्यावेळी त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. सुमारे 10 ते 12 दिवसांच्या उपचारानंतर शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. कोरोनामुक्त झाल्यावर त्यांंना 30 ऑगस्ट पर्यंत AIIMS मध्ये ठेवण्यात आले होते.
ANI ट्विट
दरम्यान, नरेंद्र मोदी सरकारच्या अनेक मंत्र्यांना आजवर कोरोनाची लागण झाली आहे, सुदैवाने त्यातील बहुतांंश जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल केंद्रीय मंंत्री नितिन गडकरी यांंना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. गडकरी यांंची प्रकृती स्थिर असल्याने त्यांंनी स्वतःला घरातच आयसोलेट करुन घेतले आहे.