PM-CARES Fund मधील किती रक्कम आरोग्य मंंत्रालयाला मिळाली? पाहा डॉ. हर्षवर्धन यांंनी काय दिलं उत्तर

हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांंना सवाल करत आरोग्य मंंत्रालयाला पीएम केअर्स फंड मधील किती रक्कम मिळाली आणि त्याचा काय वापर केला असे विचारले.

Union Health Minister Dr Harsh Vardhan (Photo Credits: PTI)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session 2020) कॉंग्रेस सहित विरोधी पक्षांंनी पीएम केअर्स फंडचा (PM Cares Fund)  मुद्दा उचलुन धरला आहे. आज सुद्धा लोकसभा खासदार अधीर रंंजन चौधरी (Adheer Ranjan Chaudhari) यांंनी थेट केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांंना सवाल करत आरोग्य मंंत्रालयाला पीएम केअर्स फंड मधील किती रक्कम मिळाली आणि त्याचा काय वापर केला असे विचारले. याशिवाय आरोग्य मंंत्रालयाने पीएम केअर्स फंड मधुन मिळालेल्या रक्कमेचे राज्यांंसाठी कसे वाटप केले असेही चौधरी यांंनी विचारले होते. यावर डॉ. हर्षवर्धन यांंनी आज संसदेत उत्तर दिले आहे. तसेच आरोग्यमंंत्री डॉ.हर्षवर्धन यांंनी आज भारतासह जगभरातील कोरोना चाचण्यांंविषयीचे (Coronavirus Vaccine) सुद्धा अपडेट संसदेत दिले आहे.

डॉ. हर्षवर्धन यांंनी सांंगितल्या नुसार पीएम केअर्स फंडमधील 893.93 कोटी रुपये हे केंद्र सरकारने आरोग्य मंंत्रालयाला दिले आहेत. याचा वापर 50,000 व्हेंंटिलेटर च्या निर्मिती साठी करण्यात आला आहे. हे व्हेंंटिलेटर संपुर्णतः मेड इन इंडिया आहेत.

ANI ट्विट

दरम्यान , यावेळेस अधिवेशनाच्या दरम्यानचा मुख्य प्रश्न उत्तरांंचा तास रद्द करण्यात आल्याने कॉंंग्रेस खासदार आपल्या भाषणातुन अनेक मुद्द्यांंवर सवाल करत आहेत, या चर्चेमध्ये पीएम केअर्स फंडचा मुद्दा वारंवार उचलुन धरला जातोय. यापुर्वी शनिवारी सुद्धा कॉंग्रेस खासदाराने पीएम केअर्स फंड मध्ये पारदर्शी कारभार होत नसल्याचे म्हंंटले होते



संबंधित बातम्या