Rajnath Singh Big Announcement: आत्मनिर्भर भारत होणार! डिसेंबर 2020 पासुन 'या' 101 संंरक्षण सामग्रींची आयात बंंद - राजनाथ सिंह
Rajnath Singh Announcement: केंद्रीय संरक्षण मंंत्री राजनाथ सिंंह (Rajnath Singh) यांंनी केलेल्या घोषणेनुसार चालु वर्षात डिसेंबर 2020 पासुन संरक्षण मंंत्रालयासाठीच्या 101 सामग्रींची आयात बंंद होणार आहे. पंंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांंनी केलेल्या आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat) च्या घोषणेवर आधारित हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या आयातीवर बंदी घातलेल्या सामग्री मध्ये केवळ सामान्य हत्यारांचा समावेश नसून आर्टिलरी गन, रायफल्स, कॉर्व्हेट्स, सोनार सिस्टम, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट्स, एलसीएच, रडार अशा मोठ्या शस्त्रास्त्रांचा समावेश सुद्धा आहे. 101 सामग्रींंची ही यादी सुद्धा संरक्षण मंत्रालयाद्वारे शेअर करण्यात आली आहे. Rajnath Singh Big Announcement: आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी 101 संरक्षण सामग्रींंची आयात बंंद, राजनाथ सिंह यांंची मोठी घोषणा
आयातीचे निर्बंध 2020 ते 2024 दरम्यान हळूहळू लागू करण्यात येतील.या निर्णयामुळे भारतीय संरक्षण क्षेत्राला त्यांच्या स्वत: च्या डिझाइन आणि विकास क्षमतांचा वापर करून सशस्त्र सैन्याच्या गरजा भागविण्यासाठी डीआरडीओने (DRDO) च्या नियमावलीनुसार सामग्री तयार करण्याची मोठी संधी मिळेल अशी आशा राजनाथ सिंंह यांंनी व्यक्त केली आहे.
आयातीवर बंंदी आणलेल्या 101 संरक्षण सामग्रींंची यादी
दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने देशांतर्गत व परकीय भांडवली खरेदी साठी 2020-21 मधील भांडवल खरेदी बजेटचे विभाजन केले आहे. चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत भांडवली खरेदीसाठी सुमारे 52,000 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.संरक्षण मंंत्रालयाद्वारे भागिदारांशी चर्चा करून आयात बंदीसाठी अधिक उपकरणे सुद्धा ठरवली जाणार आहेत.