Rajnath Singh Big Announcement: आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी 101 संरक्षण सामग्रींंची आयात बंंद, राजनाथ सिंह यांंची मोठी घोषणा

पंंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांंनी केलेल्या आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat) च्या घोषणेवर आधारित संंरक्षण मंंत्रालयाने 101 संरक्षण सामग्रींची आयात बंंद करण्याचा निर्णय घेतल्याचे आज केंंद्रीय संंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले आहे.

Rajnath Singh Big Announcement: आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी 101 संरक्षण सामग्रींंची आयात बंंद, राजनाथ सिंह यांंची मोठी घोषणा
Rajnath Singh (ANI)

Rajnath Singh Announcement: संरक्षण मंंत्रालयाच्या (Defence Ministry) माहितीनुसार, केंद्रीय संरक्षण मंंत्री राजनाथ सिंंह (Rajnath Singh) यांंनी महत्वाची घोषणा आपल्या ट्विटर अकाउंट वरुन केलेली आहे. पंंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांंनी केलेल्या आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat) च्या घोषणेवर आधारित संंरक्षण मंंत्रालयाने 101 संरक्षण सामग्रींची आयात बंंद करण्याचा निर्णय घेतल्याचे आज सिंह यांनी जाहीर केले आहे. या सामग्रींची यादी तयार करण्यात आली आहे. आयातीचे निर्बंध 2020 ते 2024 दरम्यान हळूहळू लागू करण्यात येतील.या निर्णयामुळे भारतीय संरक्षण क्षेत्राला त्यांच्या स्वत: च्या डिझाइन आणि विकास क्षमतांचा वापर करून सशस्त्र सैन्याच्या गरजा भागविण्यासाठी डीआरडीओने (DRDO) तयार केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून सामग्री तयार करण्याची मोठी संधी मिळेल,असे राजनाथ सिंह यांनी ट्विट मध्ये म्हंंटले आहे.

प्राप्त माहितीनुसार,आयात बंद केलेल्या संरक्षण सामुग्रीमध्ये सैन्य आणि हवाई दलासाठी 1,30,000 आणि 1,40,000 कोटी रुपयांचा सामुग्रीचा समावेश आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने उचललं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आयातीवर बंदी घातलेल्या सामुग्रीमध्ये केवळ साध्या हत्यारांचा समावेश नसून आर्टिलरी गन, रायफल्स, कॉर्व्हेट्स, सोनार सिस्टम, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट्स, एलसीएच, रडार अशा मोठ्या शस्त्रास्त्रांचा समावेश सुद्धा आहे.

तसेच, मंत्रालयाने देशांतर्गत व परकीय भांडवली खरेदी साठी 2020-21 मधील भांडवल खरेदी बजेटचे विभाजन केले आहे. चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत भांडवली खरेदीसाठी सुमारे 52,000 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, संरक्षण मंंत्रालयाद्वारे भागिदारांशी सल्लामसलत करून आयातबंदीसाठी अधिक अशी उपकरणे ओळखली जातील. यादीनुसार उपकरणांच्या उत्पादने वेळेत पूर्ण केली जाईल यासाठी सर्व आवश्यक तयारी केली जाणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2020 10:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).