Union Budget 2023 and Indian Stock Market: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होताना भारतीय शेअर बाजारात वधार, सेन्सेक्स-नीफ्टीत हिरवळ
पाठिमागील काही दिवसांपासून घसरलेला शेअरबाजार अर्थसंकल्पाच्या दिवशी सावरताना दिसला. बाजाराची सुरुवात होताच सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) मध्ये हिरवळ पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणुकदारांना काहीसा दिलासा मिळाला. आजच्या अर्थसंकल्पातून पुढील वर्षभरात देशाची आर्थिक स्थिती कशी असेल याची दिशा ठरणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) संसदेत आज (1 फेब्रुवारी, 2023) केंद्रीय अर्थसंकल्प 2023/2024 (Union Budget 2023-24) सादर करत आहेत. आजच्या अर्थसंकल्पातून पुढील वर्षभरात देशाची आर्थिक स्थिती कशी असेल याची दिशा ठरणार आहे. सहाजिक त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारातही पाहायला मिळाले. पाठिमागील काही दिवसांपासून घसरलेला शेअरबाजार अर्थसंकल्पाच्या दिवशी सावरताना दिसला. बाजाराची सुरुवात होताच सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) मध्ये हिरवळ पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणुकदारांना काहीसा दिलासा मिळाला. बाजार सुरु झाला तेव्हा बेंचमार्क इंडेक्स बीएसई सेंसेक्स (Sensex) 451 अंकांच्या तेजीसह 60,001.17 पातळवर तर नेशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसई (NSE) चा निफ्टी (Nifty) 82 अंकांनी वाढून 17,731.45 च्या पातळीवर उघडला. शेअर बाजरासाठी आजचा दिवस हिरवळ दाखवणारा ठरतो आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणाचा शेअर बाजारावर आज चांगला परिणाम पाहायला मिळाला. भाषण सुरु होताच सेंसेक्स 608.93 अंक (1.02%) च्या उसळीसह 60,158.83 च्या पातळीवर पोहोचला. तर,निफ्टी 164.30 अंकांच्या (0.93%) तेजीसह 17,826.45 पातळीवर पोहोचताना दिसला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7% नी वाढेल. अर्थमंत्र्यांची भविष्यवाणी किती खरी ठरते यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. (हेही वाचा, Budget 2023 Live News Updates: यंदाच्या वर्षी 6.4% वित्तीय तूट राहण्याची शक्यता)
अर्थसंकल्पीय भाषणात विद्यमान आर्थिक वर्षासाठी होणाऱ्या घोषणा शेअर बाजराचे भविष्य ठरवतील. शेअर बाजाराची आजची स्थिती पाहता तर गुंतवणुकदारांना अर्थसंकल्पीय भाषण काहिसे आवडल्याचे दिसते आहे. करण, बाजारात वाधार पाहायला मिळतो आहे. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आगोदर म्हणजेच आर्थिक पाहणी अहवाल सादर होण्याच्या दिवशीसुद्धा शेअर बाजारात वधार पाहायला मिळाला. शेअर बाजार बंद होतानाही हिरव्या निशाणासहच बंद झाला. बाजाराची कामगिरी अशाच पद्धतीने राहिल्यास भविष्यात बाजार चांगली कामगिरी करताना दिसेल.