Union Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शनिवारीही सुरु राहणार शेअर बाजार
त्यामुळे पुढच्या वर्षी शनिवार असला तरीसुद्धा शेअर मार्केट (Stock Market) सुरु राहणार आहे. सांगितले जात आहे की, शेअर बाजाराच्या आजवरच्या इतिसाहात असे पहिल्यांदाच घडत आहे.
केंद्र सरकार आपला दुसरा आर्थसंकल्प (Union Budget 2020-21) पुढच्या वर्षीच्या दुसऱ्या महिन्यातील पहिल्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2020 (शनिवार) सादर करत आहे. अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावरही मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे पुढच्या वर्षी शनिवार असला तरीसुद्धा शेअर मार्केट (Stock Market) सुरु राहणार आहे. सांगितले जात आहे की, शेअर बाजाराच्या आजवरच्या इतिसाहात असे पहिल्यांदाच घडत आहे.
सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात शक्यता वर्तवली आहे की, या वेळीही आर्थिक सर्व्हेक्शन (Economic Survey) 31 जानेवारी या दिवशी जाहीर होईल. त्याआआधी 2015-16 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी सादर करण्यात आला होता. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारही शनिवारी सुरु राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, या वेळी पुन्हा एकदा केंद्रीय अर्थसंकल्प शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2020 या दिवशी सादर करण्यावर सरकार विचार करेन. जोशी यांनी म्हटले की, परंपरा कायम राहील. मोदी सरकारनेच केंद्रात सत्तेत आल्यानंतर केंद्रय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी या दिवशी सादर केला जाईल असा निर्णय घेतला होता. या आधी यूपीए सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सादर होत असे. (हेही वाचा, अर्थसल्ला: स्टॉक मार्केटच्या तुलनेत म्युच्युअल फंडात गुंतवणूक किती सुरक्षित..?)
केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी पहिल्यांदा रेल्वे अर्थसंकल्प सादर होत असे. त्यानंतर सार्वत्रिक अर्थसंकल्प सादर होत असे. परंतू, मोदी सरकारने यातही बदल करत रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलिन केला. तेव्हापासून रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर केला जाणे बंद झाले. दरम्यान, या वेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आपल्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर करतील.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प ( Union Budget 2020-21 ) प्रभावी व्हावा यासाठी सूचना मागवल्या आहेत. या सूनचा सर्वासामान्य लोक केंद्र सरकारचे अधिकृत संकेतस्थळ mygov.in च्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवू शकतात.