Uma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन
कारण मला तीन दिवस ताप होता. मी हिमालयात सोशल डिस्टन्सिगसह सर्व नियमांचे पालन केले. पण तरीही मला कोरोनाची लागण झाली आहे.
देशभरात हाहाकार माजविणा-या कोरोना व्हायरसने (Coronavirus) आता उच्चभ्रू लोकांपासून गोरगरीबांपर्यंत सा-यांनाच आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यातच आलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती (Uma Bharti) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या उत्तराखंड च्या दौ-यावर असताना केदारनाथ यात्रेदरम्यान (Kedarnath Yatra) त्यांना कोरोनाची लागण झाली अशी माहिती ट्विटच्या माध्यमातून लोकांना दिली आहे. कोरोना झाल्यानंतर उमा भारती यांनी ऋषिकेश आणि हरिद्वारच्या दरम्यान वंदे मातरम कुंजमध्ये स्वत:ला क्वारंटाईन (Self Quarantine) केलं आहे.
उमा भारती यांनी ट्विटच्या माध्यमातून अधिक माहिती देत सांगितले आहे की, "मी केदारनाथ दर्शनानंतर प्रशासनाकडे आग्रह करत कोरोना चाचणी पथकाला बोलावले. कारण मला तीन दिवस ताप होता. मी हिमालयात सोशल डिस्टन्सिगसह सर्व नियमांचे पालन केले. पण तरीही मला कोरोनाची लागण झाली आहे." Bacchu Kadu Coronavirus Positive: बच्चु कडु यांंना कोरोनाची लागण होताच ढसाढसा रडायला लागला हा लहानगा (Watch Video)
"मी हरिद्वार आणि ऋषिकेषच्यामध्ये असलेल्या वंदे मातरम कुंजमध्ये क्वारंटाईन आहे. हे माझ्या कुटुंबासारखेच आहे. चार दिवसानंतर पुन्हा मी तपासणी करणार आहे आणि परिस्थिती अशीच असली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेऊ. माझ्या संपर्कात आलेल्या इतरांनी सावधानी बाळगा आणि आपली कोरोना चाचणी करून घ्या", असं आवाहनही उमा भारती यांनी केलं आहे.
भारतात कोरोना व्हायरसची एकूण परिस्थिती पाहता मागील 24 तासांत 88,600 नव्या रुग्णांची भर पडली असून 1,124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,992,533 वर पोहचला आहे. त्यापैकी 9,56,402 अॅक्टीव्ह रुग्ण असून 49,41,628 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 94,503 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.