Uddhav Thackeray On INDIA Bloc Rally: 'अब की बार भाजपा तडीपार', उद्धव ठाकरे यांचा दिल्ली येथून नारा; Loktantra Bachao रॅलीत घणाघात
'अब की बार भाजप तडीपार' असा दणदणीत नारा देत ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिले.
दिल्ली येथील रामलीला मैदानावर आयोजित 'लोकतंत्र बचाव रॅली'मध्ये (INDIA Bloc Mega Rally) शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भारतीय जनता पार्टीवर घणाघाती टीका केली आहे. 'अब की बार भाजप तडीपार' असा दणदणीत नारा देत ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिले. अरविंद केजरीवाल (INDIA Bloc Mega Rally) यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय द्वारा करण्यात आलेली कारवाई आणि अटक याविरोधात इंडिया आघाडीने आज (31 मार्च) दिल्ली येथे लोकतंत्र बचाव रॅली काढली आहे. त्यासाठी देशभरातील नेते उपस्थित आहेत. या वेळी रामलीला मैदानावरुन उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कुटुंबीयांना विश्वास दिला की, घाबरु नका आम्ही आपल्यासोबत आहोत. आपण ही लढाई मिळून लढू आणि जिंकू सुद्धा. संपूर्ण देश आपल्यासोबत असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ही केवळ निवडणूकीची सभा नाही. दोन बहिणी जर हिमतीने लढत असतील तर भाऊ कसा पाठिमागे राहीन. कल्पना सोरेन आणि सुनीता केजरीवाल, आपण चिंता करु नका. सर्व देश हुकुमशाही विरोधात एकवटला आहे. (हेही वाचा, Uddhav Thackeray Press Conference Delhi: भाजप भ्रष्ट जनता पार्टी झाला आहे, सर्व ठग भाजपमध्ये; उद्धव ठाकरे यांचा दिल्ली येथे घणाघात)
देशातील सत्ताधाऱ्यांना वाटते आहे, अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना अटक केली तर आम्ही घाबरुन जाऊ. पण आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही आहोत. त्यांनी देशातील नागरिकांना ओळखले नाही. या देशात हुकुमशाहीला कोणीही घाबरले नाही. सर्व जण लढणारे आहे. घाबरणारे केव्हाच निघून गेले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्यासोबत आहेत. आम्ही इंडिया आघाडी म्हणून पुढे आलो आहोत. जर हिंमत असेल तर भाजपवाल्यांनी सांगावे, देशात त्यांच्यासोबत तीन पक्ष आहेत. एक इडी, दुसरा सीबीआय आणि इनकम टॅक्स, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी लगावला. (हेही वाचा, INDIA Bloc's Mega Rally in Delhi Today: अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर इंडिया आगाडीची आज दिल्लीत 'लोकशाही वाचवा' रॅली; मल्लिकार्जून खडगे, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांची उपस्थिती)
व्हिडिओ
देशामध्ये एक व्यक्ती आणि एका पक्षाचे सरकार हुकुमशाही आणण्याच्या विचारात आहे. या लोकांनी देशातील लोकशाही संकटात आणली आहे. त्याचा विरोध करणे आवश्यक आहे. आम्ही इथे निवडणुकीच्या सभेसाठी आलो नाही. हुकुमशाहीच्या विरोधात आलो आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप केला आणि त्यांना तुरुंगात पाठवले. हे कसले सरकार आहे? भाजपने ज्यांच्यावर आरोप लावले त्यांनाच त्यांच्या पक्षात घेतले आहे. अशा भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर विश्वास कसा ठेवायचा? असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या रॅलीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी म्हटले की, देशातील सर्व भ्रष्टाचारी लोक भारतीय जनता पक्षात गेले आहेत. त्यामुळे तो पक्ष आता भ्रष्ट जनता पार्टी झाला आहे. इतकेच नव्हे तर ते आम्हाला ठग म्हणतात पण देशात जेवढे ठग आहेत त्या सर्वांचेच भाजपमध्ये स्वागत झाले आहे.