Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल TV9 Kannada Live Streaming येथे पाहा

सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. बहुतांश मतदारसंघांचे निकाल दुपारपर्यंत घोषीत झालेले असतील. सर्वच्या सर्व 224 मतदारसंघांचे निकाल संध्याकाळपर्यंत घोषित केले जाणे अपेक्षीत आहे.

Karnataka Assembly Election Result | (File Image)

Karnataka Assembly Election Result 2023 TV9 Kannada Live Streaming: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2023 शनिवारी (13 मे, 202) घोषीत केला जाणार आहे. त्यासाठी सकाळी आठ वाजलेपासूनच मतमोजणीला सुरुवात होईल. या मतमोजणीचे चे थेट कव्हरेज आपण येथे पाहू शकता. त्यासाठी आपण खाली दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करु शकता.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (13 मे 2023 रोजी) जाहीर केला जाईल. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. बहुतांश मतदारसंघांचे निकाल दुपारपर्यंत घोषीत झालेले असतील. सर्वच्या सर्व 224 मतदारसंघांचे निकाल संध्याकाळपर्यंत घोषित केले जाणे अपेक्षीत आहे. अपवादात्मक स्थितीतच हे निकाल लांबू शकतात. 15 मे 2023 पर्यंत कर्नाटक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. (हेही वाचा, Karnataka All Exit Poll Results 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी AajTak-India Today, ABP-CVoter, Axis My India यांच्यासह सर्व एक्झिट पोल्सचे निकाल पाहा एका क्लिकवर)

व्हिडिओ

दरम्यान, विधानसभा निवडणुकच्या 224 जागांसाठी 10 मे, 2023 रोजी सकाळी सात ते संध्याकाळी 6 या कालावधीत मतदान पूर्ण झाले. त्यानंतर अवघ्या काहीच मनिटांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी विविध एजन्सींच्या एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले. एक्झिट पोल्सच्या निकालांनी राज्यात त्रिशंकू विधानसभेचे संकेत दिले आहेत. त्यामुळे उत्सुकता वाढली असतानाच, कर्नाटकातील भाजप, काँग्रेस आणि जद(एस) या तीनही प्रमुख राजकीय पक्षांचे भवितव्य आज उघड होणार आहे.