IPL Auction 2025 Live

Triple Talaq Bill: 303 मतांनी 'तीन तलाक विधेयक' लोकसभेत अखेर मंजूर

303 विरुद्ध 82 मतांनी हे बिल लोकसभेत मंजूर करण्यात आले. या मुद्यावर लोकसभेत खूप गदारोळ सुरु होता. यावर काँग्रेसचे युपीए सर्व सहयोगी दलांनी या बिलाला विरोध केला.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

तीन तलाक मुद्द्यावर गेल्या कित्येक दिवसापासून राजकीय वर्तुळात गदारोळ सुरु होता. या मुद्यावर आज अखेर तोडगा निघाला आहे. तीन तलाक बिल लोकसभेत (Loksabha) बहूमतांनी मंजूर करण्यात आले आहे. 303 विरुद्ध 82 मतांनी हे बिल लोकसभेत मंजूर करण्यात आले. या मुद्यावर लोकसभेत खूप गदारोळ सुरु होता. यावर काँग्रेसचे युपीए च्या सर्व मित्र पक्षांनी या बिलाला विरोध केला. त्याचदरम्यान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, "हा महिलांच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टाने देखील म्हटले आहे की, तीन तलाक पीडित मुस्लिम महिलांना न्याय मिळाला पाहिजे."

काँग्रेस डीएमके (DMK), एनसीपी (NCP)सह ब-याच विरोधी पक्षांनी या बिलाला विरोध केला. तर तृणमूल काँग्रेस आणि जेडीयू सदस्यांनी सभागृहात वॉकआऊट केले. हे बिल मागील लोकसभेत मंजूर झाले होते. मात्र राज्यसभेने हे बिल परत केले होते.

जेव्हा पीडित महिला पोलिसांकडे जाते, तेव्हा पोलिसांनाही त्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही. त्यावेळी अशा महिलांना काय रस्त्यावर टाकायचे का असा प्रश्न देखील रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत उपस्थित केला. तसेच मी नरेंद्र मोदीं यांच्या सरकारामधील मंत्री आहे, राजीव गांधींच्या नाही, असेही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा- Lok Sabha: मोठ्या गदारोळात संसदेत सादर झाले ट्रिपल तलाक विधेयक; काँग्रेस, सपा, एमआयएमने केला तीव्र विरोध

या विषयावर बोलणा-या सर्व सदस्यांचे रविशंकर प्रसाद यांनी आभार मानले. हे बिल खास महिलांसाठी आणले गेले आहे, त्यामुळे येथील महिला सदस्यांचे विशेष आभार मानतो. असेही ते म्हणाले.