Google Maps वापरून रस्ता शोधताना पर्यटकांचे वाहन पुराच्या पाण्यात; केरळ राज्यातील घटना
या पर्यटकांची एसयूव्ही (SUV) कोट्टायम जिल्ह्यातील कुरुपंथारा भागात प्रवास करताना थेट पुराच्या पाण्यात शिरली. ही घटना घडली तेव्हा एसयूव्हीमध्ये तीन पुरुष आणि एका महिला होती.
हैदराबदमधील (Hyderabad) पर्यटकांच्या गटाला Google Maps वापरून रस्ता शोधणे चांगलेच भारी पडले. या पर्यटकांची एसयूव्ही (SUV) कोट्टायम जिल्ह्यातील कुरुपंथारा भागात प्रवास करताना थेट पुराच्या पाण्यात शिरली. ही घटना घडली तेव्हा एसयूव्हीमध्ये तीन पुरुष आणि एका महिला होती. हे सर्वजण मिळून अलाप्पुझाला जात होते.
प्राप्त माहतीनुसार, वाहन पुराच्या पाण्यात घुसले असेल तरी पर्यटकांना कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांची तातडीने सुटका केली. मात्र, त्यांचे वाहन नाल्यात पूर्णपणे बुडाले असून, ते बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अडकलेल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी जवळच्या पोलिस पेट्रोलिंग युनिट आणि स्थानिक रहिवाशांनी त्वरित प्रतिसाद दिला.
महत्वाचे असे की, अशा प्रकारची घटना प्रथमच घडली नाही. या आधीही या वर्षाच्या सुरुवातीला तमिळनाडूच्या गुडालूरमध्ये अशीच घटना घडली होती. त्या घटनेतही Google नकाशे चुकीचे दिल्यामुळे एक वाहन भलत्याच ठिकाणी गेले. त्या वेळीही उपस्थीत नागरिक आणि तरुणांनी या वाहनास मदत केली. ज्यामुळे वाहन सुरक्षितपने परतले.
दरम्यान, मागच्या वर्षी, गुगल मॅपच्या निर्देशांचे पालन करत असताना नदीत पडून दोन डॉक्टरांना जीव गमवावा लागल्याची एक दुःखद घटना घडली.
दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी केरळ पोलिसांनी पावसाळ्यात नेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सावधगिरीची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.