IPL Auction 2025 Live

'श्रीकृष्णाचा जन्म आज जेल मध्ये झाला आणि तुला त्यादिवशी जामीन हवाय'? CJI बोबडे यांचा खूनाच्या आरोपीला प्रश्न

दरम्यान तुझ्याशी धर्माचा काही संबंध नाही म्हणत बोबडे यांनी त्याच्या अर्जाला मंजुरी देत जामीन मंजुर केला आहे.

Justice Sharad Arvind Bobde (Photo Credits: Supreme Court website)

सर्वोच्च न्यायालयामध्ये मंगळवारी सरन्यायाधीश शरद बोबडे (SA Bobde) यांच्या खंडपीठासमोर सुनावणी दरम्यान काही हलके फुलके क्षण पहायला मिळाले. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका गुन्हेगाराने श्री कृष्ण जन्माष्टमी दिवशी जेलमधून बाहेर पडण्याची परवनगी मागितली होती. त्यावेळेस 'तुला जेल हवी की बेल?' असा प्रश्न बोबडेंनी विचारला ज्या दिवशी कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला तेव्हा तुला जेलबाहेर पडायचंय? असं देखील म्हणाले. हिंदू कथांनुसार, श्रीकृष्णाचा जन्म मथुरेमध्ये एका कारावासामध्ये झाला होता.

धर्मेंद्र वाळवी (Dharmendra Valvi) असं आरोपीचं नाव असून त्याला एका खुनाच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. दरम्यान तुझ्याशी धर्माचा काही संबंध नाही म्हणत बोबडे यांनी त्याच्या अर्जाला मंजुरी देत जामीन मंजुर केला आहे. CJI Bobde Spotted Checking Out Harley Davidson: जेव्हा भारताचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांना झाला हार्ले डेविडसन बाइक चालवण्याचा मोह (See Photos).

दरम्यान भगवान श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार असून त्याचा जन्म मथुरेमध्ये झाला. मथुरेत कृष्नाचा मामा कंस याने जानकी आणि वासुदेवाला बंदिवान केले होते. कारण जानकीच्या पोटी जन्म घेणारे 8वं अपत्य कंसाचा नाश करेल अशी आकाशवाणी झाली होती.

1994 साली भाजपा कार्यकर्त्याचा खून केल्याप्रकरणी धर्मेंद्र वाळवी हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान आता त्याला 25 हजारांच्या दोन जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे.