निर्मला सीतारामन यांची काळ्या नागिणीशी तुलना करत TMC नेते कल्याण बॅनर्जी यांनी केली राजीनाम्याची मागणी, See Tweet
यावर संबित बत्रा यांनी सुद्धा बॅनर्जी यांना चोख उत्तर दिले आहे.
तृणमूल काँग्रेस (TMC) चे नेते कल्याण बॅनर्जी (Kalyan Banarjee) यांनी काल बांकुरा (Bankura) येथे एका सभेत बोलत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (FM Nirmala Sitharaman) यांच्यावर अत्यंत घणाघाती टीका केली आहे. ज्याप्रमाणे काळी नागीण (Kala Nagina)डसली की लोकांचा मृत्यू होतो त्याच प्रमाणे निर्मला सीतारामण यांच्यामुळे लोक मरत आहेत. त्यांनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यांना लाज वाटायला हवी आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. त्या आतापर्यंतच्या सर्वात वाईट अर्थमंत्री आहेत अशा कटू शब्दात कल्याण बॅनर्जी यांनी निर्मला सीतारामण यांच्या विषयी भाष्य केले होते. अर्थात यावरून आता भाजपच्या नेत्यांनी बॅनर्जी यांच्यावर पलटवार करायला सुरुवात केली आहे. काही वेळापूर्वी संबित पात्रा (Sambit Patra) यांनी सुद्धा बॅनर्जी यांचे विधान लज्जास्पद असल्याचे म्हंटले आहे.
हे ही वाचा - नरेंद्र मोदी शांत आहेत, त्यांनी कोरोना व्हायरस समोर शरणागती पत्करली; राहुल गांधी यांचे ट्विट
कल्याण बॅनर्जी यांनी निर्मला सीतारामण यांची तुलना काळ्या नागिणी सोबत केळ्यावर संबित बत्रा यांनी म्हंटले की, "आजही आपल्याकडील कित्येक घरात जिथे माँ काली ची पूजा केली जाते, तिथे रंगावरून भाष्य करणे हे नक्कीच लज्जास्पद आहे मात्र त्याहूनही जास्त हा स्त्री साठ असणारा द्वेष त्यांच्या विधानातून समोर येत आहे." या विधानावर निर्मला सीतारामण यांनी अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ANI ट्विट
दरम्यान कल्याण बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सेरामपूर मतदारसंघातून जिंकून येत खासदार पद मिळवले आहे. ते स्वतः एक सुप्रसिद्ध वकील आहेत.