Tirupati Laddu Row: ‘धर्म पुनर्स्थापित करण्याची वेळ आली’, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केली 11 दिवसांच्या तपश्चर्येची घोषणा

तर आता उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी प्रायश्चित्त म्हणून 11 दिवसांच्या व्रताची घोषणा केली आहे.

Photo Credit- X

Tirupati Laddu Row: जगप्रसिद्ध तिरुपती मंदिरातील(Tirumala Tirupati Temple) प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूच्या पावित्र्य आणि शुद्धतेबाबतचा वाद अधिकच चिघळत चालला आहे. टीडीपीच्या दाव्यानुसार, वायएसआरसी सरकारच्या कार्यकाळात तिरुमाला मंदिर ट्रस्टला प्रसिद्ध तिरुपती लाडू प्रसादम बनवण्यासाठी पुरवण्यात आलेल्या तुपाच्या नमुन्यांमध्ये प्राण्यांच्या चरबीची(Animal Fat) आणि माशांच्या तेलाची भेसळ उघड झाली. आता या घटनेच प्रायश्चित्त म्हणून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे 11 दिवसांचे तपश्चर्येचे व्रत करणार आहेत.  मागील सरकारच्या चुकांची क्षमा मागण्यासाठी ही तपश्चर्या करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री, अभिनेता पवन कल्याण यांनी गुंटूर येथील श्री दशावतार वेंकटेश्वर स्वामी मंदिर येथे दर्शन घेऊन 11 दिवसांचे तपश्चर्या व्रत सुरू केले आहे. आता ते पुढील 11 दिवस तपश्चर्या करणार असून तिरुपती बालाजीची क्षमा मागणार आहेत.  (हेही वाचा: Chandrababu Naidu on Tirupati: 'आंध्र प्रदेशमधील सर्व मंदिरांची साफसफाई होणार'; तिरुपती मंदिर प्रसाद वादावर चंद्राबाबू नायडू यांची प्रतिक्रीया)

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या तेलाचा वापर केल्याचे उघडकीस आल्यापासून राष्ट्रीय पातळीवर राजकारण चांगलेच तापले आहे. तिरुपती तिरुमला मंदिरातून ३०० किलो लाडू अयोध्येला पाठवण्यात आल्याने देशभरातून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. तिरुपती मंदिराच्या प्रसादात गोमांस, डुकराची चरबी आणि माशाचे तेल मिसळल्याचेही तपासात समोर आले आहे. हे सर्व आंध्र प्रदेशातील तत्कालीन जगनमोहन रेड्डी सरकारच्या कार्यकाळात घडले आहे.

पवन कल्याण यांनी याबद्दल ‘एक्स’वर माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, 'आपली संस्कृती, श्रद्धा आणि श्रद्धेचे केंद्रस्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी धामच्या प्रसादात चुकीचे पदार्थ मिसळले गेल्याने वैयक्तिक पातळीवर मला खूप दुःख झाले आहे. याच क्षणी मी देवाकडे क्षमा मागत. प्रायश्चित्त व्रत घेत आहे. अकरा दिवस उपवास करण्याचा धार्मिक संकल्प घेत आहे. अकरा दिवसांच्या प्रायश्चित्त दीक्षेच्या शेवटी, १ आणि २ ऑक्टोबरला, मी तिरुपतीला जाईन, परमेश्वराला प्रत्यक्ष भेटेन. क्षमा मागेन आणि मग माझी प्रायश्चित्त दीक्षा परमेश्वरासमोर पूर्ण होईल.' असे पवन कल्याण यांनी म्हटले आहे.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif