Manav Sharma Suicide Case: आग्र्यात पत्नीच्या छळाला कंटाळून IT कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून सांगितली व्यथा
मानवने गळफास लावून आत्महत्या केली आणि मरण्यापूर्वी त्याचा लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी पत्नीला जबाबदार धरले.
Manav Sharma Suicide Case: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा जिल्ह्यात एका आयटी कंपनीच्या रिक्रूटमेंट मॅनेजर (Recruitment Manager of an IT Company) मानव शर्मा (Manav Sharma)ने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मानवने गळफास लावून आत्महत्या केली आणि मरण्यापूर्वी त्याचा लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी पत्नीला जबाबदार धरले. तसेच पुरुषांसाठी कायदा करण्याची मागणीही केली.
काय आहे नेमकं प्रकरण?
मृत मानव शर्मा आग्रा येथील डिफेन्स कॉलनीमध्ये राहत होता. तो एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, मानवचे गेल्या वर्षी लग्न झाले होते आणि तो नोकरीमुळे आपल्या पत्नीसोबत मुंबईत राहत होता. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्याची पत्नी अनेकदा भांडत असे आणि कुटुंबाविरुद्ध खोटे खटले दाखल करण्याची धमकी देत असे. (हेही वाचा - Atul Subhash Suicide Case: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पत्नी निकिता आणि सासरच्यांना जामीन मंजूर)
मानवच्या वडिलांनी आरोप केला की, मानवच्या पत्नीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध होते आणि जेव्हा मानवला हे कळले तेव्हा त्याची मानसिक स्थिती बिघडू लागली. फेब्रुवारी 2025 च्या अखेरीस, मानव त्याच्या पत्नीसह मुंबईहून आग्र्याला परतला, पण ती लगेच तिच्या पालकांच्या घरी गेली. यानंतर, मानवांवर मानसिक ताण आणखी वाढला.
पत्नीच्या धमक्यांनीमुळे उचलले टोकाचे पाऊल -
मानवच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांच्या सुनेच्या आई-वडिलांनीही त्याला धमकावले होते, ज्यामुळे तो आणखी अस्वस्थ झाला. या सर्व कारणांमुळे, मानव निराश झाला आणि त्याने 24 फेब्रुवारी रोजी घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी, मानवने सुमारे 6 मिनिटे 57 सेकंदांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये त्याने त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत.
पुरुषांसाठीही कायदा असावा – मानव शर्मा
त्याच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये, मानव भावूक होताना म्हणाला की, 'पापा, मम्मी, अक्कू, माफ करा... आता मी रजा घेत आहे. मी आधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता मी ते सहन करू शकत नाही. माझी बायको मला खूप त्रास देत आहे. पुरुषांसाठी कायदे का नाहीत? पुरुषांच्या हक्कांसाठी कोणी का बोलत नाही? पुरुषही एकाकी पडतात.' या घटनेनंतर मृताच्या वडिलांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मानवची पत्नी आणि तिच्या कुटुंबावर छळ आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी बेंगळुरूच्या अतुल सुभाष यांनी पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती.
आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:
टेली मानस (आरोग्य मंत्रालय): 14416 किंवा 1800 891 4416; निमहंस: + ९१ + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; पीक माइंड: 080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन: – 9999 666 555; अर्पिता आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन: 080-23655557; आयकॉल: 022-25521111 आणि 9152987821 आणि 9152987821; सीओओजे मेंटल हेल्थ फाउंडेशन (सीओओजे): 0832-2252525.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)