TikTok-Reliance Jio Deal: भारतातील ByteDance कंपनीचा व्यवहार मुकेश अंबानी यांच्या रिलायंस जिओ ला विकण्याची शक्यता - Report
रिलायंस जिओ आणि ByteDanceकंपनीमध्ये व्यवहाराची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान अद्याप त्यावर डील झाले नसले तरीही बोलणी सुरूवातीच्या टप्प्यात आहेत.
ByteDance या लोकप्रिय चायनीज व्हिडिओ अॅप कंपनी च्या TikTok वर भारतासह अमेरिकेतही बंदी घालण्यात आल्याने त्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतात रिलायंस जिओ कडे त्यांचा व्यवहार विकला जाऊ शकतो. Tech Crunch च्या रिपोर्टनुसार, मागील महिन्यात रिलायंस जिओ आणि ByteDanceकंपनीमध्ये व्यवहाराची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान अद्याप त्यावर डील झाले नसले तरीही बोलणी सुरूवातीच्या टप्प्यात आहेत.
टिकटॉकचा भारतातील व्यवहार हा सुमारे $3 billion पेक्षा देखील अधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे. अद्याप याबाबत टिकटॉक किंवा बाईटडान्स कडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या बाईटडान्स कंपनीमध्ये काम करणारे अनेकजण दुसर्या कंपनीच्या शोधात आहेत. देशा-परदेशात टिकटॉकवर बॅन असल्याने मोठं नुकसान कंपनीला सहन करावं लागत आहे तसेच आता कंपनीचं भवितव्य देखील अंधारात असल्याने आता कर्मचार्यांनी नोकरीची शोधाशोध सुरू केली आहे.
ByteDance कंपनीसाठी भारतामध्ये सुमारे 2000 कर्मचारी काम करत आहेत. देशात सध्या बाईट डान्स कंपनीने नोकरभरती थांबवली आहे. भारतामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव 58 चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉकचादेखील समावेश होता. 'कंपनीचा सर्वात मोठा आधार त्यांचे कर्मचारी असतात. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कर्मचार्यांचे हित पाहणं याकडे आमचं प्राधान्यानं लक्ष असेल' अशी माहिती TikTok CEO आणि COO of ByteDance Kevin Mayer यांनी दिली आहे.
Kevin Mayer यांनी भारतातील टिकटॉकच्या कर्मचार्यांसाठी लिहलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये, ' आम्ही 2000 पेक्षा अधिक कर्मचार्यांसाठी एक सकारत्मक आणि चांगला अनुभव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ' असं आश्वासन देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू अनेक कर्मचारी अशा परिस्थितीमध्ये द्विधा मनस्थितीमध्ये आहेत.
अमेरिकेमध्ये आता टिकटॉकच्या बॅननंतर मायक्रोसॉफ्ट कंपनी त्यांचा व्यवहार विकत घेण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत आता न्युझिलंड, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया मधील टिकाटॉकचा व्यवहार मायक्रोसॉफ़्टकडे जाऊ शकतो. Financial Times च्या वृत्तानुसार संपूर्ण जगभरातील टिकटॉकचा व्यवहार आता मायक्रोसॉफ्ट विकत घेण्याच्या विचारामध्ये आहे. अमेरिकेमध्ये TikTok, WeChat वर बंदी; US President Donald Trump प्रशासनाकडून व्यवहार बंद करण्याला 45 दिवसांची मुदत.
भारतामध्ये चीनी अॅप कंपनीच्या भोवती सार्याच गोष्टींबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने आता कर्मचार्यांमध्येही धास्ती आहे. भारत-चीन संबंध गलवान खोर्यातील हिंसक झटापटीने अधिकच बिघडल्याने आता कर्मचारी चिंतेमध्ये आहेत.
सध्या टिकटॉकचे अनेक कर्मचारी त्यांचे प्रतिस्पर्धी असणार्या Chingari, Trell, Bolo Indya आणि Sharechat सोबत काम करण्याची संधी पाहत आहे. या टिकटिकवरील बंदीमध्ये अचानक निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची संधी देखील अनेक भारतीय स्टार्टअप्सला निर्माण आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)