Tibbia College Society Wall Collapsed: दिल्ली येथे मुसळधार पाऊस, टिब्बिया कॉलेज सोसायटीमधील भिंत कोसळू एक महिला ठार

या पावसाचा फटका बसल्याने अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार दिल्ली येथील टिब्बीया कॉलेज सोसायटी (Tibbia College Society) येथील इमारत कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Tibbia College Society | (Photo credit- ANI)

Delhi wall collapse: राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका बसल्याने अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार दिल्ली येथील टिब्बीया कॉलेज सोसायटी (Tibbia College Society) येथील इमारत कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिला 58 वर्षांची आहे. भींत कोसळलेली (Wall Collapsed at Delhi) इमारत देशबंधू गुप्ता रोड (eshbandhu Gupta Road पोलीस स्टेशन हद्दीत येते.

राजधानी दिल्लीमध्ये शनिवारी पहाटेपासूनच पावसाने जोरदार बॅटींग सुरु केली. ज्यामुळे दिल्लीकरांना सकाळी सकाळीच गैरसोईचा सामना करावा लागला. पहाटेपासूच पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक ठिकाणी सकल भागात रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे वाहतूक मंदावली. परिणामी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. हवामान खात्यानेही हवामानाचा अंदाज वर्तवताना दिल्लीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे म्हटले होते. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार वरुनराजाने आपले रुप दाखवले.

ट्विट

ट्विट

दिल्ली येथील सफदरजंग वेधशाळेने सकाळी 8.30 ते 11.30 दरम्यान 21.4 मिमी पावसाची नोंद केली. तर, रिज वेधशाळेत 36.4 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नागिरकांची गैरसोय झाल्याचे आणि काही ठिकाणी दुरुघटना घडल्याचे वृत्त होते. पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याने या वृत्ताची पुष्टी करताना शनिवारी (8 जुलै) दुपारी सांगितले की, आम्हाला एमसीडी (दिल्ली महानगरपालिका) किंवा इतर एजन्सींच्या अंतर्गत असलेल्या इतर भागांवर देखील पाणी साचल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही त्या तक्रारी पुढे पाठवल्या आहेत. आतापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आहे. गुरु तेग बहादूर खालसा कॉलेजच्या आजूबाजूचा रस्ता दिल्ली विद्यापीठाच्या उत्तर कॅम्पसमध्ये पाणी साचले, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.