Uttar Pradesh Shcoker: इमारतीच्या 27 व्या मजल्यावरून पडून तीन वर्षाची मुलगी गंभीर, उत्तर प्रदेशातील घटना

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यापूर्वी देखील अशीच एक घटना घडली होती. ज्यात एका बाळ बाल्कनीतून घराच्या छतावर पडले होते.

Uttar Pradesh Shcoker PC TW

Uttar Pradesh Shcoker: उत्तर प्रदेशातील (Uttar Prades) ग्रेटर नोएडा येथे एका निवासी इमारतीच्या २७ व्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून ३ वर्षाची मुलगी पडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यापूर्वी देखील अशीच एक घटना घडली होती. ज्यात एका बाळ बाल्कनीतून घराच्या छतावर पडले होते. (हेही वाचा- तेलंगणामध्ये काळ्या जादूच्या संशयावरून महिलेला जाळले, रुग्णालयात नेत असताना मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार,  ग्रेटर नोएडा येथील गौर शहरातील एका निवासी इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून  थेट १२ व्या मजल्यावर पडली. ही घटना शुक्रवारी घडली. सुदैवाने तीचा जीव वाचला आहे परंतू ती गंभीर जखमी झाली. मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सद्या तिच्यावर उपचार सुरु आहे.

१२ व्या मजल्यावर पडल्यानंतर स्थानिकांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. मुलीली सर्वोद्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सद्या तिची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टर सद्या मुलीवर उपचार करत आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितानुसार, मुलगी बाल्कनीत खेळत होती. त्यावेळीस ती अचानक खाली पडली आणि थेट १२व्या मजल्यावर अडकली. या घटनेनंतर नागरिकांनी इमारतीच्या सुरक्षेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी मुलीच्या कुटुंबावर संताप व्यक्त केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif