Pm Modi On Deepfake: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिला 'हा' इशारा

सगळ्यांनी सावध राहण्याची गरज आहे.'' पंतप्रधान मोदींनी भाजपला 370 आणि एनडीएला 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

मार्च महिन्याला सुरुवात झाली असून लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाकडून काल लोकसभा निवडणूकीसाठी पहिली उमेदवारीची यादी देखील जाहीर करण्यात आहे.  लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्र्यांना डीपफेकच्या मुद्द्यावर सावध राहण्यास सांगितले. (हेही वाचा - MP: 'मोदीजींना माझे शब्द आवडले नसावेत', भोपाळमधून तिकीट नाकारल्यानंतर भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांची व्यथा)

पंतप्रधानांनी मंत्र्यांना सल्ला दिला की, ''आजकाल डीपफेकचे युग आहे, ज्याद्वारे आवाज देखील बदलता येतो. सगळ्यांनी सावध राहण्याची गरज आहे.''  पंतप्रधान मोदींनी भाजपला 370 आणि एनडीएला 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बैठकीदरम्यान पुढील पाच वर्षांच्या विस्तृत कृती आराखड्यावरही चर्चा करण्यात आली.  पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्र्यांना निवडणुकीदरम्यान लोकांना भेटताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. मंत्र्यांना कोणताही वाद टाळण्यास आणि डीपफेकपासून सावध राहण्यास सांगण्यात आलं आहे.

बैठकीत मे महिन्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच उचलल्या जाणाऱ्या 100 दिवसांच्या कार्यसूचीच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. विकसित भारताचा रोडमॅप हा दोन वर्षांपेक्षा जास्त काळ केलेल्या सखोल तयारीचा परिणाम आहे. यात सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारे, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग संघटना, नागरी समाज संघटना, वैज्ञानिक संस्था आणि तरुणांच्या सूचनांशी व्यापक सल्लामसलत करून सरकारच्या सर्वांगीण दृष्टिकोनाचा समावेश आहे.