Year Ender 2024: यंदा गुगलवर 'या' व्यक्तींची नावे सर्वाधिक सर्च करण्यात आली? कोण आहेत या लोकप्रिय हस्ती? जाणून घ्या

2024 मध्ये, असे बरेच लोक होते ज्यांची भारतात खूप चर्चा झाली आणि ज्यांबद्दल जाणून घेण्यासाठी लोकांनी त्यांना गुगलवर अनेकदा सर्च केलं. Google ने भारतातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विषयांचा तपशील देणारा वार्षिक अहवाल उघड केला आहे.

Vinesh Phogat, Donald Trump, Ratan Tata (फोटो सौजन्य - Instagram, Wikimedia Commons)

Most Searched People On Google in India: 2024 हे वर्ष संपायला फार कमी वेळ उरलेला आहे. 2024 मध्ये, असे बरेच लोक होते ज्यांची भारतात खूप चर्चा झाली आणि ज्यांबद्दल जाणून घेण्यासाठी लोकांनी त्यांना गुगलवर अनेकदा सर्च केलं. Google ने भारतातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विषयांचा (Most Searched People On Google) तपशील देणारा वार्षिक अहवाल उघड केला आहे. 2024 मध्ये, असे बरेच लोक होते ज्यांची भारतात खूप चर्चा झाली. यामध्ये राजकारण, क्रीडा, बॉलीवूड आणि व्यावसायिक जगतातील व्यक्तींचा समावेश आहे. 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या लोकांची नावे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

विनेश फोगट -

विनेश फोगट ऑलिम्पिकमधील कुस्ती सामन्यात 100 ग्रॅम जास्त वजनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. यानंतर हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यानही विनेशला गुगलवर खूप सर्च करण्यात आले. कुस्तीत पदक जिंकणाऱ्या विनेश फोगटला हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जुलाना मतदारसंघातून तिकीट दिले होते. या निवडणुकीत विनेश फोगटही विजयी झाल्या आहेत. (हेही वाचा - Year Ender 2024: क्रीडाविश्वासाठी 'हे' वर्ष ठरले अभूतपूर्व, टी-20 विश्वचषकापासून ते बुद्धिबळापर्यंत जगावर भारताने कोरलं आपल नाव)

रतन टाटा -

2024 मध्ये सर्वाधिक सर्च केले गेलेले नाव म्हणजे रतन टाटा. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली होती. रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाला श्रद्धांजली वाहिली नसेल अशी व्यक्ती देशात क्वचितच असेल. तसेच, अनेकांनी त्यांचे काही कोट्स त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. त्याचे वैयक्तिक आयुष्य, लव्ह लाईफ, नेट वर्थ, वारस इत्यादींबद्दल माहिती मिळविण्यासाठी लोकांनी त्याला Google वर सर्च केले. (हेही वाचा - Year Ender 2024: अभिषेक शर्मापासून हर्षित राणापर्यंत, 'या' भारतीय स्टार्सना टीम इंडियामध्ये मिळाली पदार्पणची संधी)

डोनाल्ड ट्रम्प -

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक पुनरागमनामुळे जगभरातून अभिनंदन संदेशाचा पूर आला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विजयामुळे आणि त्यांच्या विशेष कामगिरीमुळे ऑनलाइन सर्चमध्ये मोठी वाढ दिसून आली. निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात होताच भारतीय टीव्ही चॅनेलवर लाइव्ह अपडेट्स दाखवले जाऊ लागले. निवडणुकीच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता भारतातही शिगेला पोहोचली, जिथे त्यांना Google Trends वर सर्वाधिक शोधले गेले. (हेही वाचा -Year Ender 2024: 'या' वर्षी सर्वाधिक शतक झळकावणारे 'हे' आहेत टॉप-5 फलंदाज, संजू सॅमसनचेही यादीत नाव)

डी गुकेश -

18 वर्षीय भारतीय प्रतिभावान बुद्धिबळपटू गुकेश डोम्माराजूने इतिहास रचला आहे. तो जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे. 12 वर्षांनंतर एका भारतीयाने हे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी हे विजेतेपद भारताच्या विश्वनाथन आनंदच्या नावावर होते, जे त्यांनी 2012 मध्ये जिंकले होते, आता डी गुकेश दुसरा भारतीय बनला आहे. गुगलनेही रंगीत डूडल बनवून 'वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप' साजरी केली होती.

नितीश कुमार -

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या वर्षी खूप चर्चेत होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी आरजेडी सोडली आणि एनडीएमध्ये प्रवेश केला. यामुळे त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. यासोबतच नितीश कुमार यांना त्यांच्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात गुगलवर सर्च करण्यात आले आहे.

राधिका मर्चंट -

अंबानी घराण्याची नवी सून असलेल्या राधिका मर्चंटला कोण ओळखत नाही? या वर्षी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह जगभरात चर्चेचा विषय राहिला. या लग्नाला जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामुळेच यंदा गुगलवर राधिका मर्चंटचे नाव अग्रस्थानी राहिले.

चिराग पासवान -

बिहारमधील आणखी एका राजकीय व्यक्तीला या वर्षी गुगलवर खूप शोधण्यात आले, ज्याचा मोदी मंत्रिमंडळात समावेश आहे. चिराग पासवान यांच्या पक्षाच्या पाचपैकी पाच खासदारांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यामुळे नितीश कुमार आणि चिराग पासवान यांना गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले.

पवन कल्याण -

पवन कल्याण हे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. याआधी तो अभिनेताही होता. या वर्षी आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, ज्यामध्ये पवन कल्याणच्या जनसेना पक्षाने चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि भाजपसोबत निवडणूक लढवली. निवडणूक जिंकल्यानंतर पवन कल्याण यांना आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री करण्यात आले.

पूनम पांडे -

पूनम पांडेने 2013 मध्ये नशा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. इंडस्ट्रीत ती तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असते. तर 2024 मध्ये पूनम तिच्या खोट्या मृत्यूच्या बातमीमुळे खूप ट्रोल झाली होती. मात्र, नंतर पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे सिद्ध झाले.

हार्दिक पांड्या -

क्रिकेटर हार्दिक पांड्या वर्षभर चर्चेत राहिला. IPL मधील त्याच्या कामगिरीमुळे आणि भारताला T-20 विश्वचषक जिंकण्यात मदत करण्यात त्याच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे, तो Google वर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या खेळाडूंपैकी एक आहे. सर्बियन अभिनेत्री नतासा स्टॅनकोविक हिच्यासोबत झालेल्या घटस्फोटाचीही खूप चर्चा झाली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now