Coronavirus in India: देशाचा कोविड-19 चा रिकव्हरी रेट 64.54 टक्के तर रुग्ण दुप्पटीचा दर 21 दिवसांवर; आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती

मात्र कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील चांगली आहे.

Health Minister Dr Harsh Vardhan

देशात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट कायम असून कोरोना व्हायरस रुग्णांची वाढणारी संख्या सर्वसामान्यांची अस्वस्थता वाढवत आहे. मात्र कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील चांगली आहे. त्यामुळे देशाचा कोविड-19 (Covid-19) चा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 64.54% वर पोहचला असून डबलिंग रेट (Doubling Rate) म्हणजेच रुग्ण दुप्पट होण्याचा दर 21 दिवसांवर पोहचला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी दिली आहे. त्यामुळे कोविड-19 च्या भीतीखाली असलेल्या प्रत्येक नागरिकासाठी ही माहिती नक्कीच आशादायी आहे. (भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 16 लाखांच्या पार; मागील 24 तासांत 55,079 नव्या रुग्णांची उच्चांकी वाढ)

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 16 लाख 38 हजार 871 वर पोहचला आहे. त्यापैकी सध्या 5 लाख 45 हजार 318 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर देशात तब्बल 10 लाख 57 हजार 806 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. वरील आकडेवारी पाहता देशात कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान कोरोना व्हायरसवर ठोस औषधं किंवा लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत या संकटावर मात करणे कठीण आहे. परंतु, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहे.

ANI Tweet:

टेस्टिंग (Testing), ट्रॅकिंग (Tracking) आणि ट्रिटमेंट (Treatment) या आधारे देशातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. दर दिवशी 10 लाख कोविड-19 च्या टेस्ट करण्याची क्षमता निर्माण करण्याचा आरोग्य मंत्रालयाचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातील मुंबईत कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक होती. मात्र तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा दर 72 दिवसांवर पोहचला आहे.