Pranab Mukherjee Health Update: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती 'जैसे थे', सध्या व्हेंटिलेटरवर असून फुफ्फुसांच्या संसर्गावर घेत आहेत उपचार
त्यानंतर दिल्लीच्या आर्मी आर अॅन्ड आर हॉस्पिटलमध्ये मेंदूत झालेल्या गाठीचे ऑपरेशन झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान तेव्हापासूनच प्रणब मुखर्जी व्हेटिंलेटरवर आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या तब्येतीबाबत दिल्लीतील आर्मी रुग्णालयाकडून ताजे अपडेट्स येत आहेत. त्यानुसार, त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नसून ती जैसे थे आहे. ते सध्या व्हेंटिलेटरवर असून फुफ्फुसांच्या संसर्गावर (Lungs Infection) उपचार घेत आहेत अशी माहिती दिल्लीतील आर्मी रुग्णालयाने (Army Hospital, New Delhi) दिली आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे महत्त्वपूर्ण आणि क्लिनिकल पॅरामीटर्स स्थिर आहेत आणि तज्ञांच्या टीमद्वारे त्यांचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे. मात्र अद्यापही त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले आहे.
10 ऑगस्टला प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून सांगण्यात आले. त्यानंतर दिल्लीच्या आर्मी आर अॅन्ड आर हॉस्पिटलमध्ये मेंदूत झालेल्या गाठीचे ऑपरेशन झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान तेव्हापासूनच प्रणब मुखर्जी व्हेटिंलेटरवर आहे.
हेदेखील वाचा- Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती स्थिर; तब्येतीत सुधार - अभिजीत मुखर्जी
दरम्यान, मध्यंतरी पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी प्रणब मुखर्जी यांच्या निधनाचे ट्विट करत त्यांना थेट श्रद्धांजली वाहिली होती, यावरुन मोठा गोंधळ झाला होता, मात्र त्या नंतर प्रणब मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी यांनी स्पष्टीकरण देत प्रणब यांची प्रकृती नाजुक असली तरी स्थिर असल्याची माहिती दिली होती.