Tej Pratap Yadav News: 'संपूर्ण कुटुंब ड्रामा करत आहे...', तेज प्रताप यादवच्या प्रकरणावर पत्नी ऐश्वर्याची प्रतिक्रिया
पत्रकार परिषदेत ऐश्वर्या यांनी लालू कुटुंबावर तीव्र आरोप केले आहेत आणि संपूर्ण प्रकरणाला 'राजकीय नाटक' म्हटले आहे. फेसबुकवर आपले 12 वर्षांचे नाते सार्वजनिक करून लालू कुटुंबाची बदनामी करणारे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांना राजदमधून सहा वर्षांसाठी काढून टाकण्यात आले आहे.
Tej Pratap Yadav Case: राजद नेते तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्या प्रेमप्रकरण आणि सोशल मीडिया वादाच्या पार्श्वभूमीवर आता त्यांची पत्नी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी मौन सोडले आहे. पत्रकार परिषदेत ऐश्वर्या यांनी लालू कुटुंबावर तीव्र आरोप केले आहेत आणि संपूर्ण प्रकरणाला 'राजकीय नाटक' म्हटले आहे. फेसबुकवर आपले 12 वर्षांचे नाते सार्वजनिक करून लालू कुटुंबाची बदनामी करणारे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांना राजदमधून सहा वर्षांसाठी काढून टाकण्यात आले आहे.
लालू कुटुंबियांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले -
बिहारचे माजी मंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी म्हटलं आहे की, सर्व काही सर्वांसमोर आहे, मला विचारायचे आहे की जेव्हा या लोकांना माहित होते की अशा गोष्टी घडत आहेत. तेव्हा त्यांनी माझे लग्न तेज प्रताप यांच्याशी का लावून दिले. त्यांनी माझे आयुष्य का उद्ध्वस्त केले? आता त्यांचा सामाजिक न्याय कुठे गेला? ते सर्व एकत्र आहेत, कोणीही वेगळे झालेले नाही. निवडणुका असल्याने ते असे नाटक करत आहेत. मी माध्यमांकडून सर्व माहिती घेत आहे. मला अनुष्काबद्दल माहिती नव्हती. त्यांना विचारा आता माझे काय करायचे? असा सवालीही ऐश्वर्याने विचारला आहे.
तेज प्रताप यादव प्रेम प्रकरणावर पत्नी ऐश्वर्या राय यांची प्रतिक्रिया -
ऐश्वर्या राय यांनी म्हटलं आहे की, मुलाच्या चुका लपवण्यासाठी सर्व दोष मुलीवर टाकला जातो. कालच राबडी देवी तेज प्रतापच्या घरी गेल्या असतील आणि त्यांचे अश्रू पुसल्यानंतर त्यांना शांत राहण्यास सांगितले असेल. तथापि, ऐश्वर्या यांनी यावेळी स्पष्ट केलं की, ती अजूनही लालू कुटुंबाची सून आहे. यावेळी तिने मला न्याय मिळेल का? असा सवाल राबडी देवी आणि लालू यादव यांना विचारला आहे.
दरम्यान, 2018 मध्ये तेज प्रताप यांचे लग्न माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात आणि माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्याशी झाले होते. परंतु, काही महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला. हे प्रकरण सध्या कुटुंब न्यायालयात आहे. अशा परिस्थितीत, ही घटना कुटुंबासह पक्षासाठी आणखी कठीण परिस्थिती निर्माण करू शकते.