Pranab Mukherjee Health Update: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या तब्येतीत सुधारणा नाही, अजूनही व्हेंटिलेटरवर उपचार सुरु
आज 13 दिवसांनंतरही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून आलेली नाही. दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह आली असून त्यांना इतर जुने विकारही असल्याने चिंता आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या तब्येतीविषयी दिल्ली कँटच्या आर्मी रिसर्च आणि रेफरल हॉस्पिटल (Army Hospital (R&R), Delhi Cantt) मधून आज सकाळपर्यंतचे अपडेट्स आले आहेत. 10 ऑगस्टला रुग्णालयात दाखल केल्यानंतर आज 14 दिवस उलटून गेले तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसून अजूनही ते व्हेंटिलेटरवरच आहे. ते अजूनही कोमातच असून त्यांच्यावर श्वसन संसर्गावर उपचार सुरु आहेत. त्यांचे व्हायटल पॅरामीटर्स (Vital Parameters) स्थिर आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीकडे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम लक्ष ठेऊन आहे. अशी माहिती रुग्णालयाकडून मिळत आहे.
10 ऑगस्ट रोजी ब्रेन सर्जरी झाल्यापासून प्रणब मुखर्जी यांची प्रकृती खालावली असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. आज 13 दिवसांनंतरही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून आलेली नाही. दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह आली असून त्यांना इतर जुने विकारही असल्याने चिंता आहे.
हेदेखील वाचा- Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी कोमात; अद्याप प्रकृतीत सुधारणा नाही
दरम्यान मुलगा अभिजीत मुखर्जी आणि मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी हे प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीचे अपडेट्स देत असतात. 13 ऑगस्ट रोजी प्रणब मुखर्जी यांच्या निधनाची खोटी बातमी समोर आली होती. त्यानंतर मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करुन वडीलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत अफवांचे खंडन केले होते.