Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी कोमात; अद्याप प्रकृतीत सुधारणा नाही

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्यापही कोणतीही सुधारणा नसल्याची माहिती आर्मीच्या रिसर्च आणि रेफरल हॉस्पिटलमधून कडून देण्यात आली आहे.

Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी कोमात; अद्याप प्रकृतीत सुधारणा नाही
Former President Pranab Mukherjee | File Image | (Photo Credits: PTI)

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा नसल्याची माहिती आर्मीच्या रिसर्च आणि रेफरल हॉस्पिटलमधून (Research and Referral Hospital) कडून देण्यात आली आहे. प्रणब मुखर्जींची कोम्यात असून त्यांच्या फुफ्फुसांमध्ये इंफेक्शन झाले आहे. त्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांचे व्हायटल पॅरामीटर्स (Vital Parameters) स्थिर आहेत. मात्र अद्यापही त्यांना अजूनही कृत्रिम श्वसन यंत्रणेवरच (Ventilator) ठेवण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम लक्ष ठेऊन आहे.

10 ऑगस्ट रोजी ब्रेन सर्जरी झाल्यापासून माजी राष्ट्रपतींचे प्रकृती खालावली असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. आज 10 दिवस उलटल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून आलेली नाही. दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह आली असून त्यांना इतर जुने विकारही आहेत. त्यात फुफ्फुसाच्या इंफेक्शनची भर पडली आहे. (प्रणब मुखर्जी यांंची प्रकृती खालावली; फुफ्फुसांमध्ये संसर्गाचे संकेत)

ANI Tweet: 

दरम्यान मुलगा अभिजीत मुखर्जी आणि मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी हे प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीचे अपडेट्स देत असतात. 13 ऑगस्ट रोजी प्रणब मुखर्जी यांच्या निधनाची खोटी बातमी समोर आली होती. त्यानंतर मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करुन वडीलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत अफवांचे खंडन केले होते.

(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2020 12:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).