Hydroxychloroquine च्या निर्यातीला मंजूरी दिल्याने मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी मानले भारत सरकारचे आभार!

भारत देशही कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. त्याचबरोबर कोरोना विरुद्धच्या लढ्यात जगातील इतर राष्ट्रांच्या प्रयत्नांना भारत मोठी साथ देत आहे.

Abdulla Shahid, Foreign Minister of Maldives (Photo Credit-Facebook)

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी संपूर्ण जग लढत आहे. भारत देशही कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. त्याचबरोबर कोरोना विरुद्धच्या लढ्यात जगातील इतर राष्ट्रांच्या प्रयत्नांना भारत मोठी साथ देत आहे. अमेरिका, ब्राझील, इस्त्राईल पाठोपाठ मालदीवने (Maldives) देखील भारताकडे हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन (Hydroxychloroquine) या अॅंडी मलेरीया ड्रगची मागणी केली आहे. त्यानंतर भारत सरकारने Hydroxychloroquine च्या निर्यातीला मंजूरी दिली. त्याबद्दल मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद (Abdulla Shahid) यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.

याबद्दल बोलताना अब्दुल्ला शाहिद म्हणाले की, गरजेच्या वेळी मदत करणाराच खरा मित्र असतो. हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनच्या निर्यातीला मंजूरी दिल्याबद्दल भारत सरकारचे आभार. कोरोना विरुद्धच्या लढाईत हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन गेम चेंजर ठरेल. (कोरोना व्हायरस विरोधातील लढ्यात शक्य ती मदत करण्यास भारत सज्ज; इस्त्राईल पंतप्रधान, ब्राझील राष्ट्राध्यक्ष यांच्या आभारावर व्यक्त होताना PM नरेंद्र मोदी यांचे ट्विट)

ANI Tweet:

यापूर्वी भारताने अमेरिका, ब्राझील, इस्त्राईल या देशांना Hydroxychloroquine चा पुरवठा केला आहे. कोरोना व्हायरसच्या संकट काळात मदत केल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष Jair Bolsonaro यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या सर्वांच्या आभारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रीया दिली आहे. संकट काळात देशा-देशांमधील संबंध अधिक बळकट होतील. तसंच या कठीण प्रसंगात शक्य ती मदत करण्यास भारत तयार असल्याचे मोदी म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif